Panipuri Health Benefits: आपल्या सर्वांनाच पाणीपुरी खायला प्रचंड आवडते. काही जण तर पाणीपुरीशिवाय (Punipuri) राहूच शकत नाहीत. मुंबईचा चाट म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी हा पदार्थ कॉलेजच्या (Panipuri Healthy Benefits) गॅदरिंगपासून, घरच्या घरी बनवण्यापर्यंत ते अगदी लग्नात खाण्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे आपणही पाणीपुरीचा बेत कधीच चुकवत नाही. परंतु तुम्हाला माहितीये का की, पाणीपुरी खाण्याचा अनेक फायदे आहे त्यातून फक्त फायदेच नाहीत तर त्याचे अनेक तोटेही (Pros and Cons of Eating Panipuri) आहेत. चला तर मग जाणून घेऊया की आपण खातो ती टेस्टी पाणीपूरी आपल्या आरोग्यालाही खूप लाभदायक आहे पण त्याचसोबत पाणीपुरीचे काही तोटेही आहेत. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की पाणीपुरीचे आरोग्यदायी फायदे काय आणि तोटे काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाणीपुरीमध्येही आता अनेक प्रकारचे रंजक फूड स्टाईल्सही आले आहे. पण तरीसुद्धा आपल्यालाही आवडते ती ऑथेंटिक पाणीपुरी. अनेकांदा जास्त तिखट (Spicy Panipuri) आवडते तर अनेकांना कमी तिखट आवडते. हल्ली अति गोड पाणीपुरी खाण्याचाही ट्रेण्ड वाढला आहे. त्यातून रगडा पुरी, सेव पुरी, दही पुरी, पाणी पुरी (Sweet Panipuri) असे अनेक प्रकारही आपल्याला यावेळी आजमावता येतात. तेव्हा अशा लज्जतदार पाणीपुरीचे फायदे आहेत तरी काय हे आपल्यालाही कदाचित माहिती नसतील. त्याचबरोबर तोटे मात्र काही प्रमाणात माहिती असतील. पाणीपुरी तुम्ही रात्री उशिरा किंवा जेवायच्या आधी खाऊ नका.


पाणीपुरीचे फायदे काय आहेत? 


पाणीपुरीमुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. पाणीपुरीचे असे फायदे आहेत की यामुळे गॅसची (Gas) समस्या उद्भवते नाही त्याचबरोबर आपल्या शरीरातील एसिडिटीही (Acidity) कमी होते आणि तोंडाला घाण वासही येत नाही. परंतु पाणीपुरीमुळे आपले निरोगी पचन होते. पाणीपुरीत असलेल्या पदार्थांचा फायदा आपल्या शरीरसाठी चांगला आहे कारण त्यातून कार्ब आणि फायबरचा लाभ मिळतो. 


पाणीपुरीतल्या पाणी जलजिरा, पुदिना, जिरे, धने आणि काळं मीठ असते. त्यामुळे तुम्हाला अपचन आणि एसिडिटीचा त्रास होत नाही. सर्वात मह्त्त्वाचे कारण म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते. पाणी आणि उकडलेले पदार्थ असल्यानं त्यानं तुम्हाला कॅलरीज मिळतात आणि त्यानुसार आपले वजनही कमी होते. 


काय आहेत तोटे? 


पाणीपुरीतील पुऱ्या जर का या अधिक कडक असतील तर त्यामुळे तुमच्या घशालाही त्रास होऊ शकतो अशा वेळी तुम्हाला योग्य ती काळजी घेणे बंधनकारक ठरते. बाहेरची पाणीपुरी खाल्लानं त्याच्या स्वच्छतेवरही प्रश्नचिन्ह असते. एकतर त्यातील अस्वच्छ पाण्यामुळे तुम्हाला काही रोग होण्याची शक्यता असते तेव्हा त्यातूनही जर का त्यातील पदार्थ हे नीट उकडले गेले नसतील तर त्यानंही तुमचे पोट बिघडू शकते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)