पापड आवडीने खात असाल तर हे जरुर वाचा...
भारतीयांच्या जेवणात पापडाचा समावेश प्रामुख्याने केला जातो. अनेकदा तोंडी लावण्यासाठी पापड खाल्ला जातो.
मुंबई : भारतीयांच्या जेवणात पापडाचा समावेश प्रामुख्याने केला जातो. अनेकदा तोंडी लावण्यासाठी पापड खाल्ला जातो. खाण्याचा स्वाद वाढवण्यासाठी जर तुम्ही पापड खात असाल तर पापडाचे आरोग्याला होणारे नुकसान जाणून घेणे गरजेचे असते. जेवताना एखादा पापड खाल्ल्यास ठीक मात्र अनेकांना एकावेळेस तीन ते चार पापड खाण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
दोन पापड म्हणजे एक चपाती. जर तुम्ही डाएटिंग करत असाल आणि कमी खायचे म्हणून पापडाने पोट भरत असाल तर तुम्ही तुमचे वजन वाढवताय.
पापड अनेकदा हाताने बनवले जातात. तसेच सुकवण्यासाठी उघड्यावर ठेवले जातात. त्यामुळे पापडावर धूळ बसते. हीच धूळ पोटात जाते. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
तळलेल्या पापडामध्ये तेल आणि फॅट दोन्ही अधिक प्रमाणात असते. तळलेल्या अॅक्रिलामाईड नावाचे टॉक्सिन असते. तळल्यामुळे यात टॉक्सिनचे प्रमाण वाढते.
पापडामध्ये अनेकदा आर्टिफिशियल फ्लेवर आणि मसाले घातले जातात. हे खाल्ल्याने पोट खराब होण्याची शक्यता असते. यामुळे अपचन होण्याची शक्यता असते.
पापड बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ चांगल्या क्वालिटीचा वापर केलेला नसेल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.