मुंबई : आजकाल तणावग्रस्त होत असलेली लाईफस्टाईल आपल्याला अनेक चूकीच्या सवयींच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरत आहे. कामाच्या ठिकाणी असलेला ताण, घर आणि करियर सांभाळत पुढे जाताना होणारी कसरत पेलण्यासाठी, काही काळ या सार्‍या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी अनेकजण व्यसनाच्य आहारी जातात. सिगारेट हे अशांपैकीच एक व्यसन. सिगारेटच्या झुरक्यामध्ये सारा ताण विसरला जातो असे तुम्हांला वाटत असेल पण ही सवय  तुमच्या परिवारातील आणि प्रामुख्याने मुलांच्या आरोग्यासाठी मोठी घातक ठरू शकते. 


संशोधकांचा दावा  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अभ्यासामध्ये धुम्रपान न करणार्‍या 70,900 स्त्री पुरूषांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या लोकांच्या घरातत्यांचे आई वडील सिगारेट पित असत. 


संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, धुम्रपानाचं व्यसन असणार्‍या मुलांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. या मुलांमध्ये फुफ्फुसांचे जीवघेणे आजार जडल्याचं प्रमाण अधिक असल्याचे समोर आलं. 


पॅसिव्ह स्मोकिंग करणार्‍यांमध्ये त्यांच्या सिगारेटचा धूर इतरांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरतो. धुम्रपानामुळे मरणार्‍यांसोबतच त्यांच्या व्यसनामुळे आरोग्य बिघडून मृत्यू झाल्याचे प्रमाणही दिसून आलं आहे. 


कोणत्या आजाराचा धोका ?


जर्नल ऑफ प्रिव्हेंटीव्ह मेडिसीनच्या प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार सिगारेट न पिणार्‍यांच्या तुलनेत सिगारेट पिणार्‍या पालकांच्या सोबत राहणारी मुलं 10 तास किंवा त्याहून अधिक काळ सिगारेटच्या वासामध्ये राहत असल्यास त्यांच्या हृद्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा मुलांमध्ये 27% हृद्यविकार, 23% स्ट्रोक आणि फुफ्फुसांच्या जीवघेण्या आजाराचा धोका 42% असतो. 


मुलं की पालकं असा विचार करत असाल तर  धुम्रपानाची सवय सोडणंच अधिक फायद्याचं आहे. धुम्रपान शक्यतो घराबाहेरचं करावे यामुळे नॉन स्मॉकर्स आणि तुमच्या घरातील लोकांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही.