Pedicure Tips : कडक उन्हाळा सुरु झाला आहे. सध्या आपण सर्व बाहेर पडताना त्वचेची विशेष काळजी घ्याल हवी कारण कडाक्याच्या उन्हात, चेहऱ्याची त्वचा जी सर्वात नाजूक असते ती टॅन होऊन काळी पडते आणि खराब होते. पण बऱ्याचदा चेहऱ्याच्या त्वचेकडे लक्ष देताना हातापायांच्या त्वचेकडे आपण दुर्लक्ष करतो. परिणामी हात आणि पाय काळे दिसू लागतात आणि चारचौघात ते फारच वाईट दिसतं. (pedicure tips at home)
अशावेळी पेडीक्युर आणि  मेन्यूकेअर करण्यासाठी पार्लरमध्ये आपण हजारो खर्च करतो, पण तुम्हाला माहित आहे का ? केवळ 10 रुपयात आणि तेही घरच्या घरी जास्त पैसे आणि वेळही न घालवता तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकता.  


घरच्या घरी पार्लरसारखं पेडिक्युअर करण्यासाठीकाय काय लागतं


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    एक खोलगट बादली

  • शाम्पू

  • सैंधव मीठ 

  • नेलपेंट रिमूव्हर 

  • नेल कटर 

  • लिंबू 

  • प्युमिक स्टोन 

  • गुलाबाच्या पाकळ्या 

  • फूट स्क्रब 

  • ऑलिव्ह ऑइल/ कोकोनट ऑइल/ बदाम ऑइल 

  • क्युटिकल क्रिम 


 पेडिक्युअर कसं कराल 


  • यासाठी सर्वात आधी नखांवर आधी नेलपेंट लावलेलं असेल तर ते रिमूव्हरच्या मदतीने काढून घ्या. नेल कटाच्या मदतीने सर्व नख व्यवस्थित हव्या त्या लेन्थवर कट करून घ्या. नेल फायलरने छान शेप द्या आणि नखांची टोकं शार्प करून घ्या.  नखांमध्ये काही घाण असेल तर काढून घ्या. 

  • आता दुसरीकडे , गरम पाण्याने भरलेली बादली किंवा टब घ्या. पाणी तुम्चाला सहन होईल तास अधिक किंवा जास्त गरम घेऊ शकता.  त्यात लिंबाचा रस पिळा , गुलाबाच्या पाकळ्या, सैंधव मीठ, शाम्पूचे काही थेम्ब घाला आणि एकत्र करा. या बादलीत तुमचे दोन्ही पाय बुडवा. अगदी 20-25 मिनिट तसेच राहूद्या. त्यानंतर नेल ब्रशच्या (pedicure tips ) साहाय्याने पाय आणि नख स्वच्छ करा. 

  • यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्या. नखांवर क्युटिकल क्रीम लावून घ्या. तुमच्याकडे क्युटिकल क्रीम नसेल तर ऑलिव्ह ऑईलसुद्धा वापरू शकता.  जिथे पायाची त्वचा जास्त कडक (skincare tips) झालीये असं वाटत असेल तिथे प्युमिक स्टोनने घासा.असं केल्यास डेड स्किन निघून जाईल. 

  • आता नखांना लावलेलं क्रीम किंवा ऑइल पुसून घ्या. डेड स्किन म्हणजेच क्युटिकल्स जी नखांना चिकटलेली असते ती क्युटिकल च्या मदतीने काढून घ्या. आता चांगलं स्क्रब घ्या आणि त्याने पाय छान स्क्रब करून घ्या. (viral video)



(video credit : thenaturalglow instagram)


  • पायाचे तळवे,. टाच आणि पायाची बोटं सगळीकडे स्क्रब व्यवस्थित घासून घ्या. यानंतर पाय स्वच्छ धुवून घ्या. यानंतर एक चमचा बदामाच्या तेलात ऑलिव्ह ऑइल घेऊन पायांना छान मॉलिश करा. मग तुमच्या नखांना आणि स्किन टोनला मॅच होईल असं एखाद नेलपेंट लावा. नको असल्यास नेलपेंट लावण्याची प्रोसेस स्किप करू शकता.