'जुनं फर्निचर' चित्रपटात एकनाथ शिंदे? 'या' कलाकाराला ओळखलंत का?

गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक यांचा 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची चर्चा सुरु होती. काल 26 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात म्हाताऱ्या आई-वडिलांना जेव्हा मुलं सोडून जातात तेव्हा त्यांची कशी परिस्थिती होते आणि या सगळ्यात जेव्हा एक वडील या सगळ्याच्या विरोधात उभा राहतो तेव्हा काय होतं ते दाखवण्यात आलं आहे. थोडक्यात एका वयोवृद्ध बापाची ही कथा आहे. 

| Apr 27, 2024, 17:40 PM IST
1/7

जुनं फर्निचर

उतारवयात जेव्हा आई-वडिलांना त्यांच्या मुलांची अधिक गरज असते, तेव्हा मुलं पाठ फिरवतात. त्यावेळी ते करिअर व स्वतःच्या आयुष्यात व्यग्र होतात हे सगळं या चित्रपटातून पाहायला मिळते.

2/7

एकनाथ शिंदे यांच्या सारखा दिसला 'हा' अभिनेता

या चित्रपटातील एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यात एक भूमिका अशी आहे ज्याचा लूक हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मिळता जुळता आहे.   

3/7

कोण आहे हा अभिनेता?

अनेक लोक या अभिनेत्याला ओळखू शकले नाही. तर त्या अभिनेत्याचं नाव मकरंद अनासपुरे आहेत. मकरंद अनासपुरे या चित्रपटात एका मंत्र्याच्या भूमिकेत दिसत आहेत. 

4/7

मकरंद अनासपुरे यांचा लूक

मकरंद अनासपुरे यांचा कपाळावर लाल टिळा ,दाढी, चष्मा असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा लूक आहे. 

5/7

मकरंद अनासपुरे यांना पाहून चाहत्यांना झाले आश्चर्य

 या भूमिकेत मकरंद अनासपुरे यांना पाहून चाहत्यांना आश्चर्य झाले. कारण त्यांना या लूकमध्ये ओळखणं कठीण झालं आहे. 

6/7

दमदार डायलॉग

मकरंद अनासपुरे जे नेहमी कॉमेडी करतात त्यांचा या चित्रपटात दमदार डायलॉग आहे. यावेळी ते बोलताना दिसत आहेत की प्रकरण कोर्टात जायच्या आधीच याचं मीडिया ट्रायल सुरु झालंय.

7/7

कलाकारांमध्ये कोण-कोण आहेत?

महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर,  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब आणि शरद पोंक्षे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.