मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सगळी लोकं कोरोनाची लस घेण्यासाठी खटाटोप करत असताना अमेरिकेत मोठ्या संख्येने लोकं लस घेणं टाळत आहेत. अमेरिकेत 25 टक्के लोकं सुई लागण्याच्या भीतीमुळे लस घेत नाही. लोकांना बिअर किंवा लॉटरीचं आमिष दाखवल्यानंतर देखील लोकं लस घेण्यासाठी तयार होत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील ऑगस्टा युनिव्हर्सिटीच्या पेन मॅनेजमेंट तज्ज्ञ अ‍ॅमी बॅक्सटर यांनी सांगितलं की, संशोधनातून असं दिसून आलं आहे की वेदना, अशक्तपणा यासारख्या गोष्टींमुळे प्रौढांना सुईची भीती वाटते. 1995 मध्ये जे. जी. हॅमिल्टनने एक अभ्यास केला गेला यानंतर सुईची भीती अचानक वाढल्याचं दिसून आली. हॅमिल्टन यांनी आपल्या संशोधनात म्हटलं आहे की, 10 टक्के प्रौढ आणि 25 टक्के मुलांना सुईची भीती असल्याचं समोर आलं आहे.


बूस्टर इंजेक्शनमुळे लोकांना वाटते भिती


एका अभ्यासानुसार, वयाच्या पाचव्या वर्षी लोकांना सुईची भीती वाटली. 1980 नंतर जन्मलेल्या बहुतेक लोकांमध्ये, 4 ते 6 वयोगटात देण्यात आलेलं बूस्टर इंजेक्शन्स त्यांच्यासाठी लसीचा एक सामान्य अनुभव होता. हे इंजेक्शन्स शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त होते मात्र यामुळे सुईसंदर्भात त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती.


त्याचप्रमाणे कॅनडामध्ये 2012 मध्ये एक हजारांहून अधिक मुलांवर झालेल्या अभ्यासानुसार असं आढळलं की, 200 मध्ये किंवा त्या नंतर जन्म झालेल्या लोकांमध्ये 63 टक्के लोकांमध्ये सुईची भिती होती. 


दरम्यान लोकांमध्ये असलेल्या सुईच्या भितीचा परिणाम लस घेण्यावर दिसून येतोय. 2016 मध्ये एका अभ्यासानुसार असं लक्षात आलंय की, सुईच्या भितीमुळे किशोरवयीन मुलांनी एचपीवीचा (Human papillomavirus) दुसरा डोसंही घेतला नाही. तर दुसरीकडे 2018 च्या संशोधनात असं लक्षात आलेलं की, सुईच्या भीतीमुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी फ्लूची वॅक्सिन घेतली नाही. कोविड 19 लसीबद्दल म्हटलं तर अमेरिकन प्रौढ लोकांवर केलेल्या सर्वेक्षणातून असं समोर आलं की 52 टक्के लोकांना भीतीपोटी लस घेतली नाही.