उन्हाळ्यात अननस आरोग्यास लाभदायक
सर्दी-खोकल्यावर आराम
मुंबई : सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं असतं. उन्हाळ्यात अननस खाल्यास शरीरास त्याच्या योग्य को फायदा होतो. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. पण आरोग्याविषयी काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.
त्वचेच्या समस्यांवर उपयोगी
अननसमध्ये मोठ्या प्रमाणात सी व्हिटॅमिन असतं. त्यामुळे त्वचा हेल्दी होण्यास आणि चेहऱ्यावर येणारे पिंपल्स जाण्यास मदत होते. अननस खाल्याने त्वचा अनेक काळापर्यंत तजेलदार राहते. तसंच चेहऱ्यावरील डाग जाण्यासही मदत होते.
हाडांसाठी फायदेशीर
अननसमध्ये असणारं कॅल्शियम आणि मॅगनीज हाडांना मजबूत बनवण्याचं काम करतं. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात मॅगनीज असतं. एका कपभर अननसमध्ये ७३ टक्के इतकं मॅगनीज असतं.
सर्दी-खोकल्यावर आराम
अननस व्हिटॅमिन सी आणि Bromelain चा उत्तम स्त्रोत आहे. व्हिटॅमिन सी आणि Bromelain इन्फेक्शन पसरवणाऱ्या वायरसपासून लढण्यासाठी मदत करते. औषधासोबतच अननसाचंही सेवन केल्याने आराम पडतो.
पोटाची समस्या
अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळित राहते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे डायजेशन सिस्टम दुरुस्त करते.