मुंबई : मुले यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान गरजेचे नाही. तर मुलांना रचनात्मक आणि व्यवहारीक ज्ञान असणेही गरजेचे आहे. यासाठी मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता. इतर व्यवहारीक ज्ञान देणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर २१ व्या शताकात सर्व काही फास्ट आहे. त्यामुळे या बदलत्या काळाला योग्य पद्धतीने सामोरे जाणे जाण्यासाठी काही गुण त्यांच्यात उत्पन्न करणे, त्यांचा विकास करणेही महत्त्वाचे आहे. तर या बदलत्या काळात आपल्या मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी हे ६ गुण जरुर शिकवा...


लीडर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाला/मुलीला मोठेपणी काहीही होण्याचे स्वप्न असू द्या. त्यांच्या इच्छेनुसार, आवडीनुसार ते आपआपले करिअर क्षेत्र निवडतील. त्यांच्या आवडीचे क्षेत्र कोणतेही असले तरी त्यांच्यात नेतृत्व गुण असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याला/तिला उत्तम लीडर बनवा.


मदत करण्यासाठी प्रोत्साहित करा


मुलांना नेहमी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी प्रोत्साहित करा. ही सामाजिक भावना त्यांच्या वैयक्तिक विकासासाठीही फायदेशीर ठरेल. 


शिकण्यीची वृत्ती


मुलांना नेहमी नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरीत करा. त्यांना नव्या गोष्टी शिकण्याची संधी द्या. शिकताना त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्या. तर काही प्रश्नांची उत्तरे त्यांची त्यांना शोधायला लावा.


जबाबदारीची जाणीव


लहानपणापासूनच त्यांना जबाबदारीची जाणीव करुन द्या. याचा अर्थ त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा ताण टाकू नका. लहान-सहान गोष्टीतून त्यांना जबाबदारीची जाणीव करुन द्या. त्यासाठी त्यांनी केलेले काम, केलेला अभ्यास याची जबाबदारी घ्यायला शिकवा. तसं करण्यासाठी त्यांना प्रेरीत करा.


मार्गदर्शक बनवा


तुम्हाला असलेली माहिती, ज्ञान शेअर करण्याची सवय त्यांना लावा. मार्गदर्शन करणे हे चांगल्या लीडरचे लक्षण आहे. खूप अभ्यासाचा ताण न देता जगाशी जोडण्याची संधी द्या. त्यामुळे त्यांना नवनवे अनुभव येतील आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल. मुलांना इतर संस्कृती, धर्म याबद्दल आदरभाव निर्माण करणारे गुण विकसित करा. यामुळे मुले खूप काही शिकतात.