मुंबई : आजकाल तरूणाई जितक्या घाईने रिलेशीपमध्ये अडकण्यासाठी उत्सुक असतात तितकेच झटपट ब्रेकअप होण्याचे प्रमाणही अधिक आहे. सतत नात्यामध्ये होणारी फसवणूक, अपेक्षाभंग आणि ताणतणावातून नैराश्य वाढण्याचीही भीती असते. 


चांगले मित्रच चांगले साथीदार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका संशोधनामध्ये 43 विविध जोड्यांचा समावेश करण्यात आला होता. 10 वर्ष नात्यामध्ये राहून वेगळ्या झालेल्या जोड्यांचाही अभ्यास करण्यात आला. सर्वेक्षणानुसार ज्या जोड्यांच्या नात्यामध्ये खुलेपणा, मैत्री, एकमेकांबाबत आदर आहे त्यांचं नातं अधिक काळ टिकलं आहे. मात्र या  शोधादरम्यान सार्‍यांसमोरच हे 10 प्रश्न उभे राहिले आहेत.  


1. आपण सारखेच आहोत? 


सर्वेक्षणानुसार, यशस्वी जोडप्यांमध्ये सुरूवातीआ चांगली मैत्री झाली. कालांतराने त्यांचा बॉन्ड अधिक घट्ट होत गेला. त्यामुळे नात्याचा गंभीरपणे विचार करण्यापूर्वीच दोघांनीही आपलं नातं दोस्तीवर अवलंबून आहे का? हा प्रश्न एकदा स्वतःला नक्की विचारला पाहिजे. 


2. आपली मैत्री दृढ आहे का? 


मैत्री चांगली असेल तर कठीण प्रसंगातही तुम्ही ढगमगत नाही. संशोधनाच्या निष्कर्षानुसारही कालांतराने वेगळ्या झालेल्या जोड्यांमध्ये मैत्री कमी असल्याचं दिसून आलं आहे. बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा!


3. आपल्याला सारख्याच गोष्टी आवडतात ? 


संशोधनाच्या रिपोर्टनुसार, दीर्घकाळ नातं टिकणार्‍यांमध्ये दोघेही एकमेकांसोबत त्यांची स्वप्न, आशा अपेक्षा, नात्यांबाबत चर्चा करतात.  तुम्ही योग्य साथीदारासोबत असल्याचे '10' संकेत !


4. अपेक्षा योग्य आहेत का? 


संशोधकांच्या अहवालानुसार, दीर्घकाळ नातं टिकून राहिलेल्या जोड्यांमध्ये त्यांच्या नात्याबाबत, लग्नाबाबत योग्य अपेक्षा होत्या. नातं टिकवून ठेवण यासाठी दोन्हीकडून प्रयत्न होणं अपेक्षित आहे. त्यासाठी मेहनत करावीच लागते. 


5. साथीदारापेक्षा आपण स्वतःला अधिक श्रेष्ठ मानतो ?


एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार, नात्यामध्ये सहानुभूती असणं आवश्यक आहे. एकमेकांबद्दल आदर असणं अपेक्षित आहे. दयाभाव असल्याने अनेकदा प्रेम होण्यास वेळ लागू शकतो. मात्र गरज पडेल तेव्हा ते समोरच्यासाठी धावूनदेखील येतात. त्रास सहन करूनही मुली या '6' कारणांसाठी नातं जपतात !


6. नातं टिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय ? 


दीर्घकाळ टिकलेल्या जोड्यांमध्ये आढळून आलेली एक गोष्ट म्हणजे प्रत्येक लहान सहान कामामध्ये एकमेकांची त्यांनी दिलेली साथ. हा नातं टिकवण्याचा क्वॅलिटी टाईम आहे. 


7. त्रास होत असलेल्या गोष्टींवर आपण सामंजस्याने मार्ग काढू शकतो ? 


आजकाल संभाषणाच्या अभावामुळे नातं तुटण्याचं प्रमाण वाढलं आहे. दिवसभरात वेळ काढून त्रास होत असलेल्या किंवा गंभीर स्वरूपात असलेल्या गोष्टींबाबत बोलता आलं पाहिजे. यामुळे नातं मजबूत होण्यास मदत होते. 


8. कठीण काळातही तग धरू शकतो का ? 


कोणतीच परिस्थिती फार काळ टिकून राहत नाही. त्यामुळे कठीण काळात होत असलेल्या बदलांना समजून घेत त्यानुसार बदल करणं अपेक्षित आहे. कठीण काळातूनही तावून सुलाखून बाहेर पडल्यानंतर नातं अधिक घट्ट होतं. 


9. आपल्या मागण्यांवर आपलं नियंत्रण आहे का ? 


संशोधकांच्या दाव्यानुसार, जेव्हा प्रेम गमावण्याची, बिकट आर्थिक परिस्थितीची वेळ येते अशावेळेस अनेक गोष्टींवर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागतं. इच्छा, आशा, अपेक्षा नियंत्रणात ठेवू शकणं यामध्येच नात्यांचं यश आहे. पहिल्या भेटीत मुलामधल्या या '5' गोष्टींवर असते मुलींची नजर !


10. इतरांसमोर आपण एकमेकांची साथ देतो का ? 


आपण ज्याला पसंत करतो किंवा ज्या व्यक्तीसोबत आपल्याला सारं जीवन 
व्यतीत करायचं आहे त्याला आपल्या  मित्रपरिवाराकडून, कुटुंबाकडूनही पसंती मिळायला हवी. एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार, तुम्हा दोघांव्यक्तिरिक्त मित्र आणि कुटुंबानेही साथ दिल्यास नात अधिक मजबूत होण्यास मदत होते.