मुंबई : लग्न हा आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे योग्य जोडीदार मिळणे अत्यंत गरजेचे असते. मग या जोडीदाराची निवड करताना काही गोष्टींचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लग्नापूर्वी जोडीदाराला हे प्रश्न अवश्य विचारा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे- हे लग्न मनाविरुद्ध तर करत नाहीस ना? असे स्पष्टपणे होणाऱ्या जोडीदाराला विचारा. अनेकदा कौटुंबिक दबावाखाली मुले/मुली लग्न करतात आणि मग दोघांचीही वाताहत होते.  


# लग्न करण्यापूर्वी जोडीदाराच्या नोकरीची व्यवस्थित माहिती करुन घ्या. लग्नापूर्वी जोडीदाराच्या नोकरी आणि पगाराची तुम्हाला नीट माहिती असणे, गरजेचे आहे.


# होणाऱ्या जोडीदाराची आवड-निवड जाणून घ्या. कारण पुढे जावून त्याची/तिची एखादी सवय, आवड-नाआवड यावरून दोघांत वाद निर्माण होण्याची शक्यता असते.


# फॅमेली प्लॅनिंगवर चर्चा करा. मुले किती आणि केव्हा हवीत, यावर बोला. अन्यथा पुढे यावरुन नात्यात वाद होतात. त्यामुळे याबद्दल आधीच स्पष्टता असणे, केव्हाही चांगले.


# तुम्हाला स्वतंत्र कुटुंब हवं की एकत्र, यावर स्पष्टपणे बोलून घ्या. कारण मनाविरुद्ध दबावात राहण्यापेक्षा ही गोष्ट आधीच स्पष्ट करणे योग्य ठरेल.