धक्कादायक: फार्मा कंपनीने प्राण्यांऐवजी माणसांवर केली चाचणी, २१ जणांना बाधा
रूग्णांवर उपचार करताना औषधे घेण्यासाठी ही कंपनी त्यांना ५०० रूपये प्रतिदिन देत असे.`
चुरू : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील एका गावात आजारी पडलेल्या २१ लोकांना जयपूर येथील एका रूग्णालयात दाखल रण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित रूग्णांच्या आजारी पडण्याला एक विदेशी फार्मा कंपनी असल्याचे समजते. या कंपनीवर आरोप करण्यात आला आहे की, ही कंपनी आपल्या औषधाची चाचणी ही प्राण्यांवर न करता ती थेट माणसांवरच करते. कंपनीच्या या भयानक प्रकारामुळे गावातील लो आजारी पडले आहेत.
रूग्णांना प्रतिदिन ५०० रूपयांचे आमिष
रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णाच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'पीडित रूग्णासह त्या गावातील २१ लोक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या रूग्णांवर उपचार करताना औषधे घेण्यासाठी ही कंपनी त्यांना ५०० रूपये प्रतिदिन देत असे.'
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनीही घेतली प्रकरणाची दखल
दरम्यान, राजस्थानच्या आरोग्यमंत्री काली चरण सराफ यांनी म्हटले आहे की, हे अत्यंत भयंकर आहे. मी सरकारच्या वैद्यकीय आरोग्य प्रमुखांना आणि सचिवांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या मंडळींवर कडक कारवाई करण्यात येईल असेही मंत्री सराफ यांनी म्हटले आहे.