Which is Better Pink or White Guava: बाजारात सहसा फळं खरेदी करण्यासाठी गेलं असता काही फळांना बरीच पसंती मिळते. म्हणजे घरातून रिकामी गेलेली पिशवी घरात येताना मात्र भरलेली असते आणि या पिशवीत कुठेतरी ही फळं हमखास दिसतातच. तुमच्या घरातही असंच होत असेल. तुम्ही किंवा कुटुंबातील कुणीतरी या फळाच्या प्रेमात असेलच. हे फळ म्हणजे पेरू. (read Pink and White Guava benefits for health stomach)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिटामिन सी, लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट ही तत्वं या फळामध्ये प्रचंड प्रमाणात असतात. पेरूमध्ये असणारं मँगनीज शरीरातील प्रमाण वाढवण्यात मदत करतं. तर, यामध्ये असणारं फोलेट प्रजनन  (fertility) क्षमता वाढवण्यास फायद्याचं ठरतं. 


Hangover: लिंबू पाणी प्यायल्यानंतर दारूची नशा खरंच उतरते? जाणून घ्या यामागचं कारण


खरा पेच तेव्हा निर्माण होतो, जेव्हा पेरू कोणता खायचा असं कुणीतरी आपल्याला विचारतं. सर्वसाधारणपणे पेरुचे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे गुलाबी आणि दुसरा म्हणजे पांढरा. या फळाच्या सेवनानं रक्तातील ग्लुकोजचं (Glucose) प्रमाण नियंत्रणात राहतं. शिवाय हाडं मजबूत होण्यासाठीसुद्धा पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो. 


कोणता पेरु फायद्याचा? (Pink or White Guava)
सफेद पेरुच्या तुलनेत गुलाबी रंगाच्या पेरूमध्ये Sugar आणि स्टार्च कमी प्रमाणात असतं. सफेद पेरूमध्ये अँटीऑक्सीडेंट तत्वंही जास्त असतात. पण, आहारतज्ज्ञांच्या मते मात्र शरीराराठी गुलाबी रंगाचा पेरू फायद्याचा. 


आतला भाग गुलाबी असणाऱ्या पेरूमध्ये Vitamin A, C मोठ्या प्रमाणात असतात. सोबतच ओमेगा 3, 6, पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिडही आढळतं. यामुळं अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. पेरुमध्ये असणाऱ्या तंतुमय (Fiber) घटकांचा मधुमेह (Diabeties) असणाऱ्या रुग्णांना फायदा होतो. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठीही पेरु खाण्याचा सल्ला दिला जातो.