Hangover: लिंबू पाणी प्यायल्यानंतर दारूची नशा खरंच उतरते? जाणून घ्या यामागचं कारण

नशा उतरवण्यासाठी उतारा म्हणून लिंबू पाणी देतात. यामुळे आराम मिळतो आणि सामान्य वाटू लागतं.

Updated: Sep 19, 2022, 07:41 PM IST
Hangover: लिंबू पाणी प्यायल्यानंतर दारूची नशा खरंच उतरते? जाणून घ्या यामागचं कारण title=

Does Alcohol Addiction Really Come Off After Having Lemon: मद्य प्यायल्यानंतर शरीरावरचा कंट्रोल सुटतो. तसेच व्यक्तीला बोलताना त्रास होऊ लागतो आणि शुद्ध हरपून जाते. अल्कोहोल शरीरात जाताच गॅस्ट्रिक अॅसिडची निर्मिती होऊ लागते. अनेक जणांना यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने उलट्या होतात. नशा उतरवण्यासाठी उतारा म्हणून लिंबू पाणी देतात. यामुळे आराम मिळतो आणि सामान्य वाटू लागतं. नशेत असलेल्या व्यक्तीला सामान्य करण्यासाठी लिंबूपाणी खरंच प्रभावी ठरते का? नशेचा प्रभाव कमी करण्यासाठी लिंबू प्रभावी (Alcohol And Perovides Instant Relief) असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण ते कितपत प्रभावी आहे, याबाबत जाणून घेऊयात

लिंबू आणि नशा याबाबतचा एक अहवाल नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन या अमेरिकन सरकारच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. या अभ्यासात अल्कोहोलमुळे यकृताचे होणारे नुकसान आणि त्यात लिंबाच्या रसाचा परिणाम याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगात असं दिसून आले आहे की, लिंबाचा रस अल्कोहोलमुळे होणारे यकृताचे नुकसान कमी करण्यासाठी(Drinking Lemon After Alcohol Help) प्रभावी आहे .  तज्ज्ञांच्या मते शरीरात प्रवेश केल्यानंतर लिंबाचे सायट्रिक ऍसिड अल्कोहोलमध्ये असलेल्या इथेनॉलशी विक्रिया करून ईस्ट तयार होते. हे ईस्ट अल्कोहोलचे दुष्परिणाम कमी करते. म्हणून अनेकदा कॉकटेल बनवताना दारूत लिंबूचा वापर केला जातो. 

लिंबाचा रस कमी मद्यपान करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रभावी आहे. जर कोणी जास्त दारू प्यायली असेल तर त्याला लिंबाचा फायदा (Protective Effects of Lemon Juice) होत नाही. वास्तविक, दारू प्यायल्यानंतर मानवी यकृत ते पचवण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेस काही वेळ लागतो. पटापट दारुचे ग्लास रिचवल्याने लिव्हरची पचवण्याची क्षमता कमी होते. त्यानंतर अल्कोहल आपल्या रक्तात मिसळू लागते. तसेच शुद्ध हरपून नशा वाढू लागते. नशेत असलेल्या व्यक्तीला जास्त प्रमाणात लिंबाचा रस पिण्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. वास्तविक, लिंबू पोटात आम्ल तयार करते आणि उलट्या होण्याची शक्यता असते.

MMS लीक झाल्यास लगेच उचला असं पाऊल, Video सोशल मीडियावरून होईल Delete

दारू प्यायल्यानंतर शरीरातून अल्कोहल बाहेर निघण्याची प्रक्रिया सुरु होते. यूरीन आणि घामाच्या माध्यमातून अल्कोहल बाहेर निघते. डिहायड्रेशनमुळे शरीरातील पाणी कमी होतं. अशा स्थितीत नशेत असलेल्या व्यक्तीला अधिकाअधिक पाणी प्यायला लावणं (Lemon Water Good For Hangovers) प्रभावी ठरतं. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि अल्कोहोलचे विषारी घटक लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतात.