मुंबई : मिल्क पावडर, हा एक असा पदार्थ आहे जो पाहिला की प्रत्येकाच्या मनात दडलेलं लहान मुल लगेचच जागं होतं. अनेकजण तर ही पावडर नुसतीच मटकावून जातात. अनेकजण दुधाऐवजी मिल्क पावडरचाच वापर करतात. पण, हे करणं कितपत योग्य आहे याचा विचार कधी केलाय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Milk Powder मध्ये लॅक्टोज नसतं. त्यामुळं शरीराला यातून अपेक्षित उर्जा मिळत नाही. शिवाय यामध्ये कृत्रिम साखरेचाही वापर असतो. जी शरीराला घातक असते. 


कॅल्शियमची कमतरता 
सातत्यानं मिल्क पावडर वापरणाऱ्यांच्या शरीरा कालांकरानं कॅल्शियमची कमतरता जाणवू लागते. ती योग्य पद्धतीनं न ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया साठतात. 


ताज्या दुधात बी5 आणि बी 12 असे विटामीन असतात. पण, मिल्क पावडरमध्ये अशी तत्त्वं नसतात. 


स्थुलता वाढते 
लॅक्टोज एक प्रकारची नैसर्गिक साखर आहे, जी दुधामध्ये आढळते. पण, मिल्क पावडरमध्ये लॅक्टोज नसतं. यात असणारी कृत्रिम साखर स्थुलता वाढण्यास कारणीभूत ठरते. 


मधुमेह 
मिल्क पावडरचा अधिक वापर केल्यामुळं मधुमेहाचा त्रास सतावतो. 


कोलेस्ट्रॉल 
मिल्क पावडरमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. तर ताजं दूध अनेकदा कोलेस्ट्रॉल फ्री असतं. ज्यामुळं ताज्या दुधाचं सेवन कधीही फायद्याचं. 


पचनक्रियेत त्रास 
दुधाच्या तुलनेत मिल्क पावडरला पचण्यास अधिक वेळ लागतो. योग्य प्रमाणात ती पाण्यात न विरघळल्यास पचनाचे त्रास सुरु होतात. 


(वरील मुद्दे सर्वसामान्य माहिती आणि निरिक्षणावर आधारित आहेत. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)