Sexual Health : Sex दरम्यान Condom फाटला तर.... या कारणांमुळे येऊ शकता अडचणीत
Why Condoms Break: शारीरिक संबंधांदरम्यान फाटणारं कंडोम वापरण्याची रिस्क कोणीही घेणार नाही. यासाठीच तुम्हाला कंडोम फाटण्याची किंवा त्याला कट जाण्याची काय कारण असू शकतात, हे जाणून घेतलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही यावर योग्य वेळी उपाय करू शकता.
Sexual Health Tips: अनेकदा शारीरिक संबंधांदरम्यान (Physical intimacy) कंडोम फाटण्याची (Condom Broke) किंवा त्याला एखादा कट जाण्याची समस्या समोर येते. ही परिस्थिती फार चिंताजनक ठरू शकते, कारण Condom नको असलेली प्रेग्नेंसी आणि सेक्शुअल ट्रांसमिशन डिसीज (Sexually transmitted disease) रोखण्यासाठी एक उत्तम साधन मानलं जातं. त्यामुळे शारीरिक संबंधांदरम्यान फाटणारं कंडोम वापरण्याची रिस्क कोणीही घेणार नाही. यासाठीच तुम्हाला कंडोम फाटण्याची किंवा त्याला कट जाण्याची काय कारण असू शकतात, हे जाणून घेतलं पाहिजे. जेणेकरून तुम्ही यावर योग्य वेळी उपाय करू शकता.
या चुकांमुळे शारीरिक संबंधांदरम्यान फाटू शकतं कंडोम
थंड ठिकाणी उन्हात कंडोम ठेवणं
तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी जास्त ऊन असेल अशा ठिकाणी कंडोम ठेऊ नका. कंडोम्स थोड्या अंधाऱ्या आणि थंड जागी ठेवा. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कंडोम फ्रीज किंवा एकदम थंड जागी ठेवाल. असं केल्यानेही कंडोमच नुकसान होऊ शकतं.
डबल लेअर करणं
अधिक सुरक्षा मिळाली म्हणून, काही जणं 2-2 कंडोमचा वापर करतात, मात्र असं करू नये. कंडोमला अशा पद्धतीने डिझाइन केलं जातं, की ते सिंगल पीसमध्येच वापरलं जावं. जर एकावेळी दोन कंडोमचा वापर केलात तर फ्रिक्शनमुळे ते डॅमेज होऊन फाटण्याची शक्यता असते.
योग्य पद्धतीने वापर न करणं
जर तुम्ही पहिल्यांदा कंडोमचा वापर करत असाल तर तुम्ही त्याच्या वापराची योग्य पद्धत शिकली पाहिजे. जर तुम्ही याचा चुकीच्या पद्धतीने वापर केलात तर सेक्स दरम्यान कंडोम डॅमेज होण्याची शक्यता आहे. परिणामी तुम्ही ज्या सुरक्षेची अपेक्षा ठेवता, तशी सुरक्षा मिळणार नाही.
स्वस्त कंडोम खरेदी करू नका
शारीरिक संबंध ठेवताना असं कंडोम खरेदी करा, जे फीट बसेल. जर कंडोमची साईज जास्त छोटी झाली तर सेक्सदरम्यान ते फाटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे स्वस्त कंडोम खरेदी करण्याच्या भानगडीत पडू नका. असा कंपनीचं कंडोम वापरा, जे सुरक्षेची हमी देतात.