ड्रेस घालण्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंत; ही लक्षणं दर्शवतात जीवाचा धोका
अनेकदा लहानशा चुका मृत्यूचं कारण बनू शकतात.
मुंबई : आजच्या युगातही लोक आपल्या करिअरबाबतच्या सर्व गोष्टींबद्दल जितके जागरूक आहेत, तेवढे आरोग्यासंदर्भात नाही. कधीकधी हा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा लहानशा चुका मृत्यूचं कारण बनू शकतात. पण त्यांची चिन्हं तुम्हाला आधी अनेक दिसून येऊ लागतात. पण योग्य वेळी लक्ष न दिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे ही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे.
मृत्यूच्या 10 वर्षांपूर्वी लक्षणं सुरू होतात
मृत्यूचा विचार स्वतःसाठीच भीतीदायक असू शकतो. परंतु तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, तुमच्या दैनंदिन सवयीमुळे हे उघड होऊ शकतं की, वेळ आणि मृत्यूचं कारण काय आहे. डॉक्टर म्हणतात की, मृत्यूच्या दहा वर्षांपूर्वीही मृत्यूची लक्षणं दिसून येतात. तज्ज्ञांनी अशी 7 लक्षणं सांगितली आहेत ज्यामुळे तरूण पणात मृत्यू होऊ शकतो.
खराब फिजिकल मोटर फंक्शन धोक्याची घंटा
द सन मधील एका अहवालानुसार, ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात तज्ज्ञांनी सांगितले की, खराब फिजिकल मोटर फंक्शनचे परिणाम 65 वर्षांच्या वयापासून दिसू लागतात, जे मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. संशोधकांनी 7 वेगवेगळ्या कृती पाहिल्या ज्यामुळे असे दिसून आले की एखाद्या व्यक्तीचा तरुणपणात मृत्यू होऊ शकतो.
ही लक्षणं ध्यानात ठेवा
संशोधकांनी पाहिलेल्या 7 लक्षणांमध्ये स्वयंपाक करणं, स्वच्छतागृह वापरणे, खरेदी करणं आणि कपडे घालणं यांसारख्या दैनंदिन कामांचा समावेश आहे. याशिवाय, तुम्ही खुर्चीवरून किती वेळानंतर उठता हे देखील तुमच्या वयावर परिणाम करणारा एक मोठा घटक असू शकतो. त्याच वेळी, चालण्याची गती आणि ग्रिप स्ट्रेंथ कमी होते ही धोक्याची घंटा आहे. तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे की, मोटर फंक्शनमधील बदलांची लवकर ओळख प्रतिबंध करण्याची संधी देऊ शकते. प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय असतील.
या आधारावर केलं रिसर्च
1985-88 मध्ये तज्ज्ञांनी 35-55 वयोगटातील 6,000 लोकांची माहिती पाहिली. यामध्ये 2007 आणि 2016 मधील आकडेवारी होती ज्यात दैनंदिन जीवनशैली, त्यांचे कौशल्य आणि ग्रिप स्ट्रेंथ ही माहिती समाविष्ट होती. या कारणांमुळे मृत्यूच्या प्रकरणांचा ऑक्टोबर 2019 पर्यंत अभ्यास करण्यात आला.