मुंबई : प्रेम ही भावनाच अजब असते. अनेकदा प्रेम की आकर्षण यामधला फरकच समजत नसल्याने नात्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होते. अनेक मुलांना विवाहीत स्त्रिया आवडायला लागतात. जगभरात प्रेम आणि रिलेशनशीप या विषयावर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, मुलं विवाहीत स्त्रियांकडे आकर्षित होण्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, पहा का आवडतात मुलांना विवाहीत स्त्रिया ... 


आत्मविश्वास  - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगल मुलींच्या तुलनेत विवाहीत स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो. हा आत्मविश्वासच त्यांना आकर्षित करतो. विवाहीत स्त्रिया कठीण प्रसंगात आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतात असे त्यांना वाटते. ...म्हणून काही मुली सिंगल राहणेच पसंत करतात!


समजूतदारपणा - 


सिंगल मुलींपेक्षा विवाहित स्त्रिया अधिक केअरिंग असतात असे मुलांना वाटते. मुलांना त्यांचा केअरिंग स्वभाव अधिक आवडतो. पहिल्या भेटीत मुलामधल्या या '5' गोष्टींवर असते मुलींची नजर !


शारीरिक बदल - 


लग्नानंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर दिसून येतो. लग्नानंतर मुलींच्या चेहर्‍यावर ग्लो वाढतो. यामुळेही मुलं आकर्षित होतात. या ५ इशाऱ्यांवरुन जाणा समोरची व्यक्ती तुमच्यावर फिदा आहे!


मल्टिटास्किंग - 


लग्न झालेल्या स्त्रियांना घर आणि घराबाहेरील तिची काम सांभाळण्याचं कौशल्य अवगत झालेले असते. यामुळे अशा मुली मल्टिटास्किंग असतात. कटकट करण्यापेक्षा त्या आनंदी राहण्याकडे अधिक भर देतात. अशा आनंदी आणि सकारात्मक व्यक्तींसोबत रहायला कोणाला आवडणार नाही?