मुंबई : आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे आजारपणदेखील वाढत चालली आहेत. वाढती अस्वच्छता हे डासांच्या उत्त्पतीचं एक प्रमुख कारण बनत चाललं आहे. पण असं असुनही काही विशिष्ट लोकांनाचा डास चावण्याचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून येतं. यामध्ये काही विशिष्ट कारणं असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्यानुसार या '5' प्रमुख कारणांमुळे काही विशिष्ट लोकांनाच डास चावण्याचं प्रमाण अधिक आहे. डासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!


गरोदर स्त्रिया - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डास मादींना मानवी शरीराजवळ कार्बन डायऑक्ससाईडचं प्रमाण सुंगण्याची खास क्षमता असते. त्यानुसार  गरोदर स्त्रिया इतरांच्या तुलनेत 21% अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. यामुळे गरोदर स्त्रियांकडे डास आकर्षित होण्याचा धोका अधिक असतो.   


'O' रक्तगट 


 Journal of Medical Entomology च्या अहवालानुसार 'O' रक्तगटाच्या लोकांकडे डासांचा खास ओढा असतो. या रक्तगटाच्या विशिष्ट वासाकडे डास आकर्षित होतात असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.   अपघातानंतर 'या' रक्तगटाच्या रूग्णाचा मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक, संशोधनात खुलासा


 अति घाम येणार्‍यांमध्ये -  


 घामातून वाहणारं लॅक्टिक अ‍ॅसिड डासांना आकर्षित करतं त्यामुळे यंदा डासांपासून तुम्हांला बचाव करायचा असेल तर काळजी घ्या. यंदाच्या उन्हाळ्यात इनडोअर व्यायामाकडे अधिक लक्ष द्या. घामामुळे तुमच्या शरीराचं तापमान वाढल्यास डास तुमच्याकडे आकर्षित होण्याचा धोकाही अधिक वाढतो.  


 जणुकांकडे आकर्षित होतात -  


 शास्त्रज्ञांमते काही विशिष्ट जणुकांकडे डास आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे.  त्या वासाकडे डास आकर्षित झाले की आपोआपच त्यांना डंख मारण्याचे प्रमाणही अधिक असते.   


 बिअर प्यायल्यास -  


 आफ्रिकेत झालेल्या एका संशोधनानुसार, बिअर प्यायलेल्या पुरूषांकडे डास अधिक आकर्षित होतात. जपानमध्ये अल्कोहल सेवन केलेल्यांमध्ये डास अधिक आकर्षित होतात असे म्हटले जाते. मात्र या दाव्यांवर जगात विविध मतं आहेत. त्यामुळे या दाव्यांबाबत अनेकांच्या मनात शंकाही आहेत.