गरोदर स्त्रियांंनी डाळिंब खाण्याचे फायदे
गरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे.
मुंबई : गरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. या काळात स्त्रियांना स्वतःच्या आरोग्यासोबतच गर्भाची काळजी घेणं गरजेचे असते. स्त्रियांच्या आहारावर गर्भाची वाढ आणि विकास अवलंबून असतो. म्हणूनच आहारात काही पदार्थांचा समावेश करणं हितकारी आहे.
गरोदरपणाच्या काळात डाळिंब खाणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे गरोदर स्त्रियांच्या सोबतीने गर्भाच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
डाळिंबाचे फायदे -
गरोदरपणाच्या काळात स्त्रियांच्या शरीरात मुबलक प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. अॅनिमियाचा धोका कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.
गरोदरपणाच्या काळात अनेक पोटाचे विकर बळावण्याची शक्यता असते. यामध्ये अपचन, बद्धकोष्ठता, पोट बिघडणे, पचनसंस्थेचे त्रास बळावतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.
गर्भाच्या हाडांना मजबुती देण्यासाठी गरोदर स्त्रियांमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. डाळिंबामुळे मांसपेशींनादेखील मजबुती मिळते.
गरोदरपणाच्या काळात रक्त कमी असल्यास प्रसुतीच्या वेळेस त्रास होऊ शकतो. डाळिंबामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. सोबतच नॉर्मल डिलेव्हरी होण्यासही मदत होते.