मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात हवेत गारवा असल्याने सोबतीला चहाचा कप असेल तर दिवसाची सुरूवात अगदी परफेक्ट होते. चहाच्या सोबतीने पावसाचा आनंद द्विगुणित होतो. अनेकांची दिवसाची सुरूवात ही चहाने होती. मात्र सकाळी उठल्या उठल्या काहीही न खाता पहिला चहा पिणं आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का?  


सकाळी चहाने दिवसाची सुरूवात करण्याचे दुष्परिणाम - 


मन अस्वस्थ होणे - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6-7 तासाच्या झोपेनंतर सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा पिणं आरोग्याला अपायकारक आहे. यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य बिघडते. अचानक अस्वस्थ्य वाटणं, उलटी होणं हा त्रास जाणवतो. 


थकवा - 


सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी दूधाचा चहा पिणं आरोग्याला त्रासदायक ठरते. दिवसाची सुरूवात चहाने केली तरीही कामामध्ये मरगळ जाणवते. चहामध्ये दूध मिसळल्याने अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्सचा परिणाम कमी होतो. 


पित्त वाढते - 


पित्ताचा त्रास असणार्‍यांनी दिवसाची सुरूवात चहाने करण टाळावे.  6-7 तास काहीही न खाता थेट चहा प्याय्ल्याने पोटात पित्त वाढते. पोटात अल्सरचा त्रासही वाढतो. 


लठ्ठपणा -


लठ्ठपणाची समस्या आजकाल झपाट्याने वाढते. चहा पावडर आणि साखरेमुळे शरीरात चरबी वाढते. परिणामी वजन वाढण्याचा धोकादेखील बळावतो. 


आरोग्य बिघडते -  


रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात प्रोटीन आणि इतर पोषक घटक शोषून घेण्याची क्षमतादेखील कमी होते. याचा आरोग्यावर परिणाम होतो. शरीरात पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते.