मुंबई : आजकाल वजन वाढीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे. खूप प्रयत्न करूनही वजन कमी करणे कठीण होते.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? व्यायामापासून ते डाएटपर्यंत सर्व काही करता. पण त्यामुळेही फारसा फरक जाणवत नाही. त्याचे कारण म्हणजे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात महिला या चूका करतात.


प्रोटीन्स न घेणे-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रोटीन्स शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी करताना ते संतुलित प्रमाणात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात व अतिरिक्त फॅटपासून सुटका होते.



फळे न खाणे-



फळात नैसर्गिक स्वरुपात साखर असल्याने अनेक लोक फळे खाणे टाळतात. पण फळात अनेक पोषकघटक असतात. ते सहज विसरले जाते. फळे कॅन्सर, हृदयरोग, स्टोक, टाईप २ मधुमेह आणि स्थुलता यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करतात.



अपूर्ण झोप-



झोप पूर्ण न झाल्यास आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. मेटॉबॉलिझम कमी होते. परिणामी वजन वाढू लागते.



व्यायाम-



व्यायामाचा शरीरावर परिणाम व्हावा असे वाटत असल्यास वेळोवेळी व्यायामप्रकारात बदल करा.