मुंबई :  चटकदार पावभाजी, गरम तळलेले वडे किंवा समोसे किंवा अगदी घरच्या घरी केलेली पुरी भाजीदेखील मन आणि पोट दोन्ही तृप्त करते. परंतू उन्हाळ्याच्या दिवसात हे चित्र थोडं बदलेलं दिसते. थंडीच्या दिवसात वाढलेली भूक उन्हाळ्यात कुठे गायब होते  याबाबतचा खास सल्ला तज्ञांनी दिला आहे. 


भूकेचं कार्य कसं चालतं ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूकेवर पोटाचे नियंत्रण असते असे तुम्हांला वाटत असेल तर हा केवळ गैरसमज आहे. प्रत्यक्षात भूक ही मेंदूकडून नियंत्रित होत असते. मेंदूतील hypothalamus या केंदामध्ये भूकेचे नियंत्रण असते. तसेच तुमचे पोट भरले आहे का ? याबाबत संकेत देण्याचे कामही याच केंद्राकडून केले जाते. यासोबतच  ghrelin हे हंगर हार्मोन देखील काम करत असते. यावर शरीराला भूक लागण्याची क्षमता, खाल्लेले अन्न पुरे आहे की नाही ? या बाबत संकेत पोहचवण्याचे काम केले जाते.


उन्हाळा वाढतो तेव्हा काय होते ?


वातावरणात होणार्‍या बदलांप्रमाणे शरीरही बदल करते. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता मॉईश्चरायझर शोषूण घेते. अशा दिवसात शरीरात थंडावा राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. याकरिता घामाच्या स्वरूपात पाणी शरीराबाहेर टाकले जाते. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात डीहायड्रेशनच्या समस्येचा त्रास आढळून येतो.


शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम कोण करतं ?


Hypothalamus हा मेंदूतील भाग उन्हाळ्यात दोन प्रकारे काम करते. एकीकडे शरीरात थंडावा ठेवण्याचे काम केले जाते तर दुसरीकडे तुमच्या भूकेवर नियंत्रण ठेऊन खाण्याचे प्रमाण नियंत्रित केले जाते.


शरीरातून घाम वाहत असतो तेव्हा Hypothalamus चे भूकेकडे फारसे लक्ष नसते. म्हणूनच पचनसंस्थेतूनही अधिक प्रमाणात उष्णतेची निर्मिती केली जाते. Hypothalamus त्यामुळेही भूक कमी करण्यासाठी प्रयत्नशील असते.परिणामी तहान वाढते आणि भूक मंदावते. यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासाठी सतत  पाणी पिण्याची इच्छा वाढते.


उन्हाळ्याच्या दिवसात यामुळेच कोणती काळजी घ्यावी ?


उन्हाळ्याच्या दिवसात ऋतूमानानुसार शरीरही त्याच्या कार्यामध्ये बदल करते. त्यामुळे मंदावलेल्या भूकेचे प्रमाणही सहाजिकच असते. त्यामुळे उगाच इच्छेविरूद्ध जाऊन जेवू नका. भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा. जसा वातावरणात बदल होईल, पावसाळा येईल तसा आपोआपच तुमच्या जेवणात बदल होईल.