या ६ कारणांमुळे कंबरेजवळील चरबी वाढते!
तुमच्याही कंबरेजवळील भाग अधिक सुटू लागल्याचे तुम्हाला जाणवते का?
मुंबई : तुमच्याही कंबरेजवळील भाग अधिक सुटू लागल्याचे तुम्हाला जाणवते का? कारण आजकाल ही समस्या अगदी सामान्य झाली असून अनेकजण त्यामुळे त्रस्त आहेत. यासाठी फक्त जंक फूड कारणीभूत नसून अनेक गोष्टी जबाबदार आहेत. आपली गुंतागुतीची आणि धावपळीची जीवनशैली देखील याला जबाबदार ठरते.
पुरेशी झोप न घेणे:
अपुऱ्या झोपेचा परिणाम कंबरेजवळील चरबी सुटण्यावर होतो. पुरेशी झोप न घेणे हे दिवसाला ३०० अधिक कॅलरीज घेण्यासमान आहे.
तुमची बॉडी अँपल शेप असल्यास:
जर तुमची बॉडी अँपल शेप असेल तर मांड्या, पार्श्वभागाऐवजी कंबरेजवळील भाग सुटण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला जेनेटीकरित्या असा त्रास असेल आणि तुमची अँपल शेप बॉडी असेल तर त्यापासून सुटका मिळवणे काहीसे कठीण आहे.
तुम्ही दिवसभर बसून असल्यास:
दिवसभर बसून राहिल्याने वजन वाढते. विशेषतः शरीराच्या खालच्या भागाचे ( lower body) वजन अधिक वाढते. जर तुमचे काम बैठ्या स्वरूपाचे असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घ्या आणि थोडं फिरून या.
अयोग्य फॅट्सचे सेवन:
मटण, दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या सॅच्युरेटेड फॅट्सच्या अति सेवनाने visceral fat वाढीस लागते आणि कंबरेजवळील भागात जमा होऊ लागतात.
तणावग्रस्त असल्यास:
जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर तुमच्या कंबरेजवळ अधिक फॅट्स जमा होण्याची शक्यता जास्त असते. cortisol हे स्ट्रेस हार्मोन कंबरेभोवती visceral fat जमा होण्यास कारणीभूत ठरते.
रात्री उशिरा जेवण्याची सवय:
जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर झोपेत फॅट्सचे ऊर्जेत रूपांतर करणे शरीराला कठीण जाते. त्यामुळे चरबी वाढते. तसंच अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.