नियमीत मीठपाण्याचे सेवन आरोग्यास लाभदायक
आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे.
मुंबई : आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे बऱ्याच हानिकारक समस्या जसे कि स्थूलपणा व मधुमेह यापासून बचाव होण्यास मदत होते. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठपाण्यामुळे फक्त मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. काळ्या मिठाचे पाणी प्यावे त्यामध्ये ८० पेक्षा जास्त खनिजे असतात.
त्वचा विकार :- या पाण्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग अशा समस्या दूर होतात.
वजन कमी करणे :- कोमट पाण्यातून काळे मीठ प्याल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे स्थूलपणा कमी होतो. कोलेस्ट्रोल देखील कमी करण्यास मदत करते. मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
झोपेसाठी उपयुक्त :- नियमित मीठ पाण्याचे सेवन केल्यास झोपेच्या समस्या कमी होतात. त्यामुळे अनिद्रेचा त्रास पूर्णपणे बरा होतो.