मुंबई : बरेच पुरुष हे संयमी नसतात. त्यांना बऱ्याच गोष्टीची घाई लागलेली असते. त्यामुळे त्यांना महिलांच्या अनेक सवयी आवडत नाही आणि त्यांना राग येतो. खरंतर पुरुषांच्या अशा सवयींबद्दल तुम्ही अनेकदा वाचले आणि ऐकले असेल, ज्या महिलांना आवडत नाहीत. परंतु महिलांनो आज आम्ही तुम्हाला महिलांच्या अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या पुरुषांना अजिबात आवडत नाहीत आणि त्या पाहून त्यांचा मूड खराब होतो. त्यामुळे तुम्हाला तुच्या नवऱ्याला किंवा जोडीदाराला खूप ठेवायचे असेल तर काय नाही केलं पाहिजे हे जाणून घेतलं पाहिजे.


वॉशरूम गॉसिप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रेश होण्यासाठी असो किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत असो की पुरुषांना समजत नाही की, महिला या ग्रुप करुन वॉशरूममध्ये का जातात?


शेवटच्या क्षणी टच-अप


पार्टीला जाण्याच्या किमान दोन तास आधी महिला बेडरूमला कुलूप लावून तयार होऊ लागतात. त्यानंतरही घरातून बाहेर पडताना त्यांच्या हातात मिनी मेकअप किट नक्कीच असते. घटनास्थळी पोहोचल्यावर ती कारमधून खाली उतरण्यापूर्वी पुन्हा टचअप करू लागते. नवरा किंवा बॉयफ्रेंड त्यांच्या या सवयीमुळे खूप चिडतो.


विनाकारण हसणे- विनाकारण मोठ्याने हसणाऱ्या महिलांवर मुले अनेकदा रागावतात.


मी लठ्ठ आहे का? असा प्रश्न


महिलांचा हा प्रश्न प्रत्येक पुरुषाला बुचकाळ्यात पाडतो. अनेक स्त्रिया त्यांच्या जोडीदाराला त्यांच्या लुक आणि फिगरबाबत हे प्रश्न नक्कीच विचारतात. गंमत म्हणजे मुलींना त्यांच्याच मानचं उत्तर ऐकायला आवडतं. म्हणून मग अशा प्रश्नांपासून मुलं लांब पळतात.


फेस पॅक


महिला त्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा फेसपॅक लावतात, परंतु आजपर्यंत पुरुषांना या फेसपॅकमागील रहस्य समजू शकलेले नाही की ते लावल्याने त्यांचे सौंदर्य आणि त्वचा खरोखरच सुधारते का? परंतु असे असले तरी मुलांना मुलींचं असं वागणं आवडत नाही.


कपड्यांचा अभाव


महिलांच्या वॉर्डरोबमध्ये रुमाल ठेवायला जागा नसली तरी कोणत्याही पार्टीत किंवा लग्नाला जाण्यापूर्वी महिला त्यांच्याकडे घालायला कपडे नसल्याची तक्रार करतात. महिलांची ही सवय पुरुषांना अजिबात आवडत नाही.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)