मुंबई : रिलेशनशिपमध्ये प्रत्येक तरूण-तरूणी असतातच. या रिलेशनशिपमध्ये अनेक वेळा ब्रेकअप होतात. त्यामुळे दोघांचा हद्य तुटतं. मुल ब्रेकअप सॉंग एकूण आपला संपुर्ण वेळ घालवतात. मात्र मुली ब्रेकअप काळात काय करताय हे तुम्हाला माहितीय का? नाही ना, तर जाणून घेऊयात मुली ब्रेकअपनंतर काय करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॉक करतात 
जर एखाद्याचे ब्रेकअप झाले असेल, तर बहुतेक मुली सर्वप्रथम त्या व्यक्तीला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ब्लॉक करतात. त्यामागचे कारण म्हणजे संवादाचे माध्यम संपवणे. काही मुली बॉयफ्रेंडचा नंबरही मोबाईलवरून डिलीट करतात. 


बॉयफ्रेंडची हेरगिरी
अनेकदा मुली ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंडचे अफेअर्स जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ब्रेकअप झाल्यानंतर तो दुसऱ्या मुलीसोबत आहे किंवा त्याची मैत्रीण कोण आहे हे ते हेरतात. बॉयफ्रेंडच्या नवीन मैत्रिणीमध्ये काय खास गोष्टी आहेत त्या शोधतात. 


स्वतःला आनंदी दाखवतात
ब्रेकअपनंतर मुली खूप उदास होतात. त्या स्वतःला कोणत्या ना कोणत्या मार्गाने सांभाळण्याचा प्रयत्न करतात. शक्य तितके आनंदी राहण्याचा प्रयत्न करत दुःख लपवायचा प्रयत्न करतात. त्यांच्या आनंदी असण्यामागे एक कारण देखील आहे, त्यांना हसताना पाहून त्यांच्या बॉयफ्रेंडला वाईट वाटावे.  


मित्रांसह मजा मस्ती करतात
मुली अनेकदा नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्या मित्रांची मदत घेतात. त्यांना जुने दिवस जगायचे असतात. यासाठी त्या आपल्या मित्रासोबत मजा मस्ती करतात. जेणेकरून ते त्यांचे नाते विसरून नवीन जीवन सुरू करू शकतील.