Relationship Tips: लग्नानंतर, बहुतेक लोकांची इच्छा असते की त्यांचे नाते कोणत्याही अडचणीशिवाय आयुष्यभर अतूट राहावे, परंतु वैवाहिक जीवनात अशा अनेक समस्या असतात ज्यांना सामोरे जाण्यासाठी जोडपी नेहमीच तयार नसतात. सामान्यतः असे मानले जाते की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक भावनिक असतात, म्हणून पत्नीला तिच्या पतीसोबत चांगले संबंध ठेवण्याची काळजी नेहमीच असते. (relationship tips how to deal with girls who are flirting with you)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वेळा पत्नीच्या लक्षात येते की तिचा पती ऑफिसच्या सहकाऱ्यांशी मेसेज करून किंवा समोरासमोर फ्लर्ट करतोय. अशा परिस्थितीत तणाव तर येणारच... पण घाबरण्याऐवजी तुम्ही स्मार्टली ही गोष्ट हॅन्डल करू शकता. अशी परिस्थिती कशी हाताळायची कशी हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Flirting At The Workplace) 


आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?


तुमच्या पतीशी मोकळेपणाने बोला - (communicate with your partner) 
याविषयी तुम्ही तुमच्या पतीशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे आणि जे तुम्हाला वाटतंय ते तुमच्या पतीशी वेळीच बोला. पुरुषांना इतर स्त्रियांचे हेतू समजत नाहीत कारण त्यांना वाटते की लग्नानंतर त्यांच्याशी कोण फ्लर्ट करेल, परंतु नेहमीच असे नसते. जर पत्नीने पतीला योग्य पद्धतीने बोलून समजावून सांगितले तर पतीलाही या प्रकरणाचे गांभीर्य समजू शकेल.


पतीसोबत मोकळे रहा - (set your partner free)
जेव्हा तुम्ही तुमची चिंता तुमच्या पतीला सांगता, तेव्हा पतीनेही त्याबद्दल काहीतरी प्रतिक्रिया दिली पाहिजे, तुम्ही त्याला मोकळेपणाने बोलण्याची संधी देण्याचा प्रयत्न करा आणि केवळ स्वतःचे मत लादण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही तुमच्या पतीसोबत तुमचे विचार मोकळेपणाने मांडाल, तर त्यालाही तुमचे मन तुमच्यापुढे मोकळं करण्यास संकोच वाटणार नाही. 


आणखी वाचा - Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल


पतीसोबत चांगला वेळ घालवा - (spend time with your partner)
जर दुसरी एखादी स्त्री तुमच्या पतीकडे लक्ष ठेवत असेल तर ऑफिस संपल्यानंतर तुम्ही पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि सकारात्मक संवाद ठेवा. शक्य असल्यास त्यांच्यासोबत फिरायला जा किंवा कुठेतरी खाण्याचा बेत आखा. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पतीचे अधिकाधिक लक्ष तुमच्याकडे वेधून घ्याल. 


(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)