मुंबई : जर तुम्ही रात्रीची अगदी आरामदायक आणि चांगली झोप घेऊ इच्छिता तर तुम्ही झोपायला जाण्याअगोदर काही गोष्टी डोक्यातून काढणं महत्वाचं आहे. कारण झोपताना डोक्यात इतर कोणत्या गोष्टी असतात तेव्हा त्याचा परिणाम झोपेवर होत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोक्यातून मानसिक तणाव, दबलेल्या काही इच्छा आणि तीव्र कडूपणा या भावना डोक्यातून बाहेर काढा अन्यथा तुम्हाला अनिद्राचा त्रास होऊ शकतो. निद्रानाशामुळे उच्च रक्तदाब, कंजेस्टिव हार्ट फेल्योर, डायबिटीज आणि इतर आजारांचा निद्रानाशाशी सरळ संबंध येतो. 


हार्ट केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ के के अग्रवाल यांनी सांगितलं की, आयुर्वेदात झोपेमुळे वात आणि पित्त दोष वाढतो. याचं मुख्य कारण म्हणजे मानसिक तनाव, अपुऱ्या इच्छा आणि मनातील कटूपणा. 


तसेच त्यांनी सांगितलं की, याचप्रमाणे अनिद्राच्या इतर कारणांमध्ये कफ, अपचन, चहा, कॉफी आणि दारूचे अधिक सेवन कारणीभूत आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे देखील झोपे फरक पडतो. अनिद्राचे तीन प्रकार आहेत तीव्र, क्षणिक आणि निरंतन चालणारा प्रश्न.


अनिद्रा म्हणजे झोपेत सतत अडथळा येते. स्लीप मेंटीनेंस इन्सोम्निया म्हणजे झोपेत अनेक त्रास होणे. सतत जाग येणे, जाग आल्यावर लगेच झोप न लागणे, योग्य झोप न मिळते, चिंता - काळजी याचा परिणाम देखील झोपेवर होत असतो.