मुंबई : बदललेल्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत आहे, हे आपण सगळेच जागतो, अनुभवतो. एकातून दुसरा आजार जन्म घेतो आणि प्रकृती अधिकच खालावत जाते. अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


हा आजार असल्यास हार्ट अॅटकची शक्यता दुप्पट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचआयव्ही(ह्यूमन इम्यूनोडेफिसियंसी व्हायरस) असलेल्यांना हार्ट अॅटक येण्याची शक्यता दुप्पटीने अधिक असते, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे निष्कर्ष एका शोधप्रत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यानुसार एचआयव्ही व्हायरस रक्तातील फॅट्सचे प्रमाण वाढवतात आणि त्याचबरोबर शरीरातील साखरेचे प्रमाण नियमित होण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे हृदयासंबंधित आजार होऊ शकतात.


 गेल्या २० वर्षात तिप्पट वाढला धोका


एडिनबर्ग वर्ल्ड युनिव्हर्सिटीचे लेखक अनुप शहा यांनी सांगितले की, जिथे एचआयव्ही अधिक प्रमाणात आहे. तिथे हृदयविकारांची समस्या वाढत आहे.


एचआयव्ही आणि हृदयविकारांचा एकमेकांशी संबंध असल्याची खूप कमी माहिती उपलब्ध आहे. पण या व्हायरसमुळे रक्तवाहिन्यात सूज येऊ शकते. त्यामुळे हृद्याच्या कार्यावर ताण येतो आणि धोका उद्भवतो.
जगाचा विचार केल्यास समोर आलेले आकडे काहीसे धक्कादायक आहेत. त्यातून हेच स्पष्ट होते की, एचआयव्हीशी संबंधित हृदयविकार गेल्या २० वर्षात तिप्पट वाढला आहे. कारण एचआयव्ही ग्रस्तांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जगातील ३.५ कोटी लोक एचआयव्ही ग्रस्त आहेत आणि या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.