Research : बाटलीबंद पाणी प्यायल्याने पुरुषांना नपुंसकत्वाचा धोका? धक्कादायक खुलासा
बाटलीबंद पाणी शरीरातील हार्मोन्सला हानी पोहोचवतं. इतकंच काय तर आपल्या प्रजनन क्षमतेवरही त्याचे परिणाम होऊ शकतात.
Health News : पाणी (Water) म्हणजे जल, आणि जल म्हणजे जीवन. पृथ्वीवरील सर्व सजीवांचं जीवन पाण्यावरच अवलंबून आहे. पाणी हे सर्व प्राणीमात्राला लाभलेलं वरदान आहे. पुरातन काळात तलाव, नदि आणि विहिरीतल्या पाण्यातून मणुष्य आपली तहान भागवत होता. त्यात प्रगती झाली आणि हँडपंपद्वारे पाणी मिळू लागलं. त्यानंतर जमाना आला नळयोजनेचा. नळाद्वारे थेट घरात पाणी मिळू लागलं. पण आता पाणी प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये बंद झालं आहे. सुरुवातीला केवळ हॉटेलमध्ये बाटलीबंद (Bottled Water) पाणी मिळत होतं. पण आता घरा-घरात, कार्यालयात सर्रास बाटलीबंद पाण्याचा वापर केला जातो. पण मिनरल वॉटर (Mineral Water) समजून तुम्ही जे पाणी पीत आहात ते तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. प्लॅस्टिक बॉटलमधील साठलेलं पाणी मानवी संस्कृतीला कसं धोकादायक बनत चालले ते जाणून घेऊया.
रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा
फ्रंटिअर्स डॉट ओरजीने एका संशोधनात मोठा खुलासा केला आहे. संशोधनानुसार सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने बाटलीबंद पाणी गरम होतं, यामुळे प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये असलेले मायक्रोप्लास्टिक्स (Microplastics) पाण्यात मिसळत. ते पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि शरीरातील हार्मोन्सला (Hormones) हानी पोहोचवतात. इतकंच काय तर मनुष्याच्या प्रजनन क्षमतेवरही (Fertility) याचा परिणाम होऊ शकतो. बाटलीबंद पाणी जास्त काळ प्यायल्याने वंध्यत्वाची (Infertility) समस्या निर्माण होऊ शकते. म्हणजेच तुम्ही भविष्यात आई किंवा वडील बनू शकणार नाही. बाटलीबंद पाणी तुमच्या यकृतालाही (Liver) हानी पोहोचवत आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणालाही धोका
बाटलीबंद पाणी हे प्लास्टिक (Plastic) बाटलीत बंद असतं. पाणी प्यायल्यानंतर प्लॅस्टिकच्या बाटलीचा उपयोग शून्य असतो, त्यामुळे ती बाटली आपण फेकून देतो. पण प्लास्टिकमुळे पर्यावरणाची (Environment) मोठी हानी होत आहे. रॉयटरच्या अहवालानुसार पृथ्वीवर दर एका मिनीटाला 10 लाख प्लॅस्टिकच्या बाटल्या विकल्या जातात. तर युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2021 मध्ये जगभरात 480 अब्ज प्लास्टिकच्या बाटल्या विकल्या गेल्या आहेत.
बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला
अनेक ठिकाणी सार्वजनिक पाणवठा किंवा पाणपोईची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे अगदी छोट्या दुकानतही सहजपण उपलब्ध होणारं बाटलीबंद पाणी आपण विकत घेतो. सार्वजिनिक कार्यक्रमांमध्ये, कार्यालयांमध्ये बाटलीबंद पाण्याचाच वापर केला जातो. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता, यामुळे बाटलीबंद (bottled water) पाण्याच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे. पण दीर्घ काळ बाटलीबंद पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही. बाटली तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक पेट्रोलियम पदार्थ आणि इतर रसायनांचा वापर करून तयार केलं जातं. त्यामुळे ही पाण्याची बाटली कालांतराने खराब होऊ शकते आणि त्या बाटलीतली रसायनं पाण्यात मिसळू शकतात.