Corona Update : कोरोनाच्या BF.7 सब व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी, अभ्यासात धक्कादायक खुलासा

चीनमध्ये ओमायक्रॉनच्या BF.7 या सब व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. हा सब व्हेरिएंट किती धोकादायक आहे, आपण घेतलेली लस त्यावर किती प्रभावी ठरणार आहे, वाचा...

Updated: Dec 26, 2022, 01:29 PM IST
Corona Update : कोरोनाच्या BF.7 सब व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी, अभ्यासात धक्कादायक खुलासा title=

Omicron New Variant BF.7: भारतात गेल्या दोन वर्षात कोरोना (Corona) प्रादुर्भावामुळे उद्भवलेली भयानक परिस्थिती लोकं आजही विसरलेली नाहीत. रुग्णालयात बेडची कमतरता, रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्यासाठी चाललेली धडपड, स्मशानभूमीत सतत जळणाऱ्या चीतांनी संपूर्ण देश हादरला होता. आपली जवळची माणसं गमावल्याने अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. छोटे-मोठे उद्योग बंद पडल्याने अनेकजण देशोधडीला लागले. कामं मिळणं बंद झाल्याने मजुरांनी आपली कुटुंबासह शेकडो मैल चालत गाव गाठलं. डोळ्यात अश्रू आणणारं हे चित्र आजही डोळ्यासमोर उभं आहे.

कोरोना लाटेसाठी ओमायक्रॉन कारणीभूत
देशात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) कारणीभूत ठरला होता. त्यानंतर देशात वेगाने लसीकरण (Vaccination) मोहिम राबवण्यात आली आणि कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं. सध्या देशात कोरोना आटोक्यात आहे, पण आता पुन्हा एकदा कोरोना भारताच्या वेषीपर्यंत आला आहे. चीनसह काही देशांमध्ये ओमाक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 BF.7 (Omicron New Variant BF.7) ने धुमाकूळ घातला आहे. 

चीनसह काही देशांमध्ये BF.7 चं थैमान
चीन, अमेरिकासह काही देशांमध्ये BF.7 सब व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात या नव्या व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अलर्ट जारी (Alert Notice) करण्यात आला आहे. अशात आपण घेतलेल्या लस BF.7 विरुद्ध लढण्यास सक्षम आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात केलेल्या अभ्यासात मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

BF.7 वर जुनी लस किती प्रभावी?
सेल होस्ट आणि माइक्रोब जनरलच्या अभ्यासानुसार BF.7 हा सब व्हेरिएंट लसीमुळे शरीरात उत्पन्न होणाऱ्या अॅंटिबॉडीला (Antibody) चकवा देऊ शकतो. BF.7 व्हेरिएंटमध्ये कोरोना विषाणूच्या पहिल्या व्हेरिएंटपेक्षा 4.4 पट अधिक प्रतिकारशक्तीआहे. लसीमुळे लोकांच्या शरीरात अँटिबॉडि तयार झाले असले तरी हा विषाणू त्यांना संक्रमित करु शकतो. 

बीएफ-7 ची 'R' व्हॅल्यू जास्त
BF.7 ची 'R' व्हॅल्यू 10 ते 18 च्या दरम्यान आहे. याचा अर्थ BF.7 ची लागण झालेला व्यक्ती आपल्या आसपासच्या किमान 10 ते 18 लोकांना संक्रमित करु शकतो. जागतिक आरोग्य संस्थेनेही (WHO) आतापर्यंतच्या व्हेरिएंटपेक्षा BF.7 व्हेरिएंटचा आर व्हॅल्यू सर्वाधिक असल्याचं सांगितलं आहे. याआधीच्या अल्फा व्हेरिएंटचा आर व्हॅल्य 4-5 आणि डेल्टा व्हेरिएंटचा आर व्हॅल्यू 6-7 इतका होता.

BF.7 चा भारताला किती धोका?
भारतात या व्हेरिएंटचा अद्याप धोका नाही. पण तरीही प्रत्येकाने खबरादारी घेण्याची गरज आहे. कोविड नियमावलीचं पालन करण्याबरोबरच सावध राहण्याची आवश्यकता आहे. या व्हेरिएंटचे रुग्ण भारतात आढळले असले तरी अद्याप 4 ते 5 प्रकरणंच समोर आली आहेत. केंद्र सरकारने कोविड नियमावली जारी केली आहे.