मुंबई : आपण मिनरल वॉटर आणि शितपेय प्यायल्यानंतर शितपेय तसेच पाण्याच्या बाटल्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करतो. अनेकदा अशा बाटल्यांत पाणी भरून त्यांचा पुन्हा वापर करतो. मात्र, हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यांचा वापर टाळा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मिनरल वॉटर आणि शितपेयांच्या वाटल्या अनेक आजारांना निमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात. नुकताच 'ट्रेडमिल'ने एक अहवाल प्रकाशित केलाय. ट्रेडमिलने या प्लॅस्टिक बाटल्यांची चाचणी केली आणि धक्कादायक  बाब उघड झाली.


या चाचणीदरम्यान पाण्याच्या बाटल्यामध्ये त्यांना बॅक्टेरिया आढळले. गांर्भीयाची बाब म्हणजे एका टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्टेरिया आढळत नाही त्यापेक्षा कैक पटीने बॅक्टेरिया या प्लॅस्टिकच्या बाटल्यात आढळतात असे चाचणीदरम्यान समोर आलेय.


या बॅक्टेरियामधले ६० टक्के बॅक्टेरिया हे माणसांना आजारी पाडण्यास मदत करु शकतात. त्यामुळे शितपेय किंवा पाण्याच्या बाटल्यांचा पुर्नवापार न करण्याचा सल्ला देण्यात आलाय. तेव्हा आरोग्यावर होणारा याचा परिणाम लक्षात घेता या बाटल्या न वापरण्याचा सल्ला  ट्रेडमिलने दिला आहे.