भारतात रोजचा आहार असलेले गहू, तांदूळ नाही सुरक्षित! संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
Rice and wheat Low Food Value: आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल या संशोधनातून चिंता निर्माण करण्यात आली आहे.
Rice and wheat Low Food Value: भारतीयांच्या नेहमीच्या आहारात तांदूळ आणि गहूचा वापर सर्वात अधिक वेळा केला जातो. तांदळाचा भात तसेच गव्हाच्या चपात्या प्रत्येक घरात नियमित खाल्ल्या जातात. पण ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असं कोणी सांगितलं तर? हो. एका संशोधनातून हे समोर आले आहे. घरी खाल्ल्या जाणाऱ्या धान्यावर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. तांदूळ आणि गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांबद्दल एका अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. 'डाउन टू अर्थ'ने यावर तपशीलवार संशोधन केले आहे.
तांदूळ, गव्हाची पिकांमध्ये पोषणमूल्य कमी होत असून ते शरिरासाठी हानिकारक विषारी पदार्थ देखील जमा करत आहेत, असे संशोधनात समोर आले. आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल या संशोधनातून चिंता निर्माण करण्यात आली आहे. समोर आलेल्या संशोधनानुसार, भारतीय वापरत असलेले तांदूळ आणि गहू यांचे पौष्टिक मूल्य सतत कमी होत चालले आहे. गेल्या पाच दशकांमध्ये, भारताने अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी उच्च उत्पादन देणारे तांदूळ आणि गव्हाच्या वाणांची वाढत्या प्रमाणात ओळख करून दिली आहे.
दरम्यान, ICARच्या नेतृत्वाखालील करण्यात आलेल्या संशोधनात धान्यांच्या पोषक घटकांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. उत्पादन वाढवण्यासाठी तयार केलेल्या प्रजनन कार्यक्रमांमुळे जस्त आणि लोहासारख्या आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. यामुळे तांदूळ, गहू या प्रमुख पिकांचे आहार मूल्य कमी झाले आहे.
प्रतिकार करण्याची क्षमता संपते!
तांदूळ गव्हासारख्या पोषक तत्वांमध्ये घट होत चालली आहे. यासोबतच ब्रिडींग प्रोग्राममुळे तांदूळातील आर्सेनिक सांद्रतामध्ये 1,493 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ अतिशय चिंताजनक आहे. विषाक्त द्रव्यांमधील ही आश्चर्यकारक वाढ मुख्य अन्नपदार्थाच्या आधीच तडजोड केलेल्या पौष्टिक मूल्याबद्दल चिंतेचा आणखी एक थर जोडते. आधुनिक ब्रिडींग प्रोग्राममुळे या वनस्पतींनी विषाविरूद्ध त्यांची नैसर्गिक उत्क्रांती संरक्षण यंत्रणा गमावली आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. या ब्रिडींग प्रोग्राममुळे पोषक तत्वे सातत्याने कमी होत आहेत. तसेच हानिकारक घटकांचा प्रतिकार करण्याची वनस्पतींची क्षमता बिघडत चालली आहे. माणसाच्या दैनंदिन जिवनातील अत्यावश्यक मुख्य अन्नपदार्थांच्या सेवनाशी संबंधित असलेल्या पदार्थांमुले संभाव्य आरोग्य धोके वाढू शकतात.
आता गहू-तांदूळ खाल्ल्याने वाढतील आजार
सध्याचा ब्रिडींग प्रोग्रामचा ट्रेंड असाच चालू राहिला तर 2040 पर्यंत धान्यांत पौष्टिक कमतरता येईल आणि देशातील असंसर्गजन्य रोग लक्षणीयरित्या वाढलेले दिसतील. मूलतः अन्न सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने उच्च-उत्पादक वाणांचा जलद अवलंब केला जात आहे. याचा परिणाम भारतीयांच्या आहारावर होतोय. हे करत असताना धान्यांच्या पौष्टिक अखंडतेशी अनवधानाने तडजोड झाली आहे.
उपाय शोधणे सुरु
या समस्येचे गांभीर्य समजून घेऊन, भारतातील अन्नधान्याच्या घटत्या पौष्टिकतेचे प्रमाण कमी करण्यासाठी भरीव प्रयत्न सुरू आहेत. कृषी शास्त्रज्ञ शक्य ते उपाय करण्याच्या प्रयत्नात आहेत. याचाच एक भाग म्हणून लँडरेसच्या जंगली प्रजाती आणि लागवड केलेल्या वाणांचा शोध घेतला जात आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या बायो-फोर्टिफिकेशनच्या विशेष प्रकल्पात ICAR आणि इतर कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यामुळे उच्च पौष्टिक तत्वे असलेल्या पिकं शोधले जात आहे.