What to eat for weight loss, roti or rice: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जणांना लठ्ठपणाची समस्या दिसून येते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बेली फॅट आणि लठ्ठपणा कमी करायचा असेल तर व्यायामासोबत आहारावरही भर दिला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या आहारात बरेच बदल करतो. यावेळी सर्वांच्या मनात एक प्रश्न येतो की, वजन कमी करायचं असेल तर आहारात भाताचा समावेश करावा की चपातीचा? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतांश लोकांना असं वाटतं की, भाताच्या सेवनामुळे वजन वाढते किंवा बेली फॅट वाढतं. मात्र चपाती आणि भात खाल्ल्याने वजन कमी करता येऊ शकतं, याची तुम्हाला कल्पना आहे का? यासाठी केवळ तुम्हाला ते खाण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. चपाती आणि भात या दोन्हीमध्ये कर्बोदके जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नेमकं कशाचं सेवन केलं पाहिजे, हे पाहूयात.


चपाती आणि भात खाल्ल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. ग्लुकोज हे तुमच्या शरीराला ऊर्जा देतं. म्हणूनच चपाती आणि भात खाणं आवश्यक आहे. चपाती आणि भातामध्ये केवळ कर्बोदके नसून प्रथिनं, जीवनसत्त्वं देखील असतात. परंतु वजन कमी करण्यासाठी या दोघांचं प्रमाण जाणून घेणं आवश्यक आहे.


भात आणि चपातीमध्ये किती असतात कॅलरीज?


चपाती


आपल्या प्रत्येकाच्या जेवणात चपाती ही असतेच सामान्य पिठाच्या चपातीमध्ये सुमारे 100 कॅलरीज असतात. गव्हाच्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण सर्वाधिक असतं. चपातीमध्ये 60 ते 70 टक्के कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त प्रथिनं, चरबी, जीवनसत्त्वं आणि खनिजे असतात. रोटीमध्ये 20 ते 22 टक्के फॅट आणि 10 टक्के प्रथिनं असतात.


भात


जर तुम्ही एक वाटी भात खात असाल भातामध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात. तर सुमारे 80 टक्के कर्बोदके असतात आणि चरबी, प्रथिने असतात. पांढऱ्या तांदळात जीवनसत्त्वं आणि खनिजं नसतात. तर ब्राऊन राईसमध्ये कार्बोहायड्रेट्सशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस ही आवश्यक खनिजे असतात.


वजन कमी करण्यासाठी काय खाल्लं पाहिजे?


तांदूळ आणि चपाती यांच्यातील पौष्टिक मूल्य जवळपास सारखीच आहेत. भातामध्ये रोटीपेक्षा जास्त कर्बोदके असतात. भात खाल्ल्याने पोट लवकर भरत असले तरी स्टार्चमुळे ते लवकर पचतं. त्यामुळे तुम्हाला पुन्हा लवकर भूक लागते. त्याच वेळी, रोटीमध्ये भातापेक्षा जास्त प्रोटीन आणि फायबर असते, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहतं.


दुसरीकडे पांढऱ्या तांदळापेक्षा चपातीमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरससारखी खनिजं जास्त असतात. दोघांचा ग्लायसिन इंडेक्सही सारखाच असल्याने शुगर आणि रक्तदाब नियमित राहतो. त्यामुळे तुम्ही आहारात भात किंवा चपाती यापैकी काहीही एक निवडू शकता.