मुंबई : पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं आणि ते खरं देखील आहे. आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचं आहे. आपल्या शरीरात पाणी कमी झालं, तर आपल्यावा वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे, असा अनेक तज्ज्ञ सांगतात. परंतु तुम्हाला माहितीय का, की आरोग्यासाठी चांगले असलेले पाणी कोणत्याही वेळेस प्यायल्याने त्याचा आरोग्यावर उलटा परिणाम होतो. ज्यामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही, किंवा यासंदर्भात अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात. आजचा लेख याच विषयावर आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर किती पाणी प्यावे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या.


पाणी कधी प्यावे?


डॉक्टरांच्या मते, अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण आपल्या पचनशक्तीला अन्न पचवायला २ तास लागतात. अशा परिस्थितीत पाणी प्यायल्यास पचनक्रिया थंड होते आणि पचनसंस्थेच्या कामावर परिणाम होतो. अशा स्थितीत व्यक्तीने जेवल्यानंतर ४५ ते ६० मिनिटांनंतर पाणी प्यावे. याशिवाय तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी पाणीही घेऊ शकता.


जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ब्लोटिंग, अॅसिडीटी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.


पाणी पिण्याची योग्य वेळ


जर एखाद्या व्यक्तीने जेवणानंतर 1 तासानंतर पाणी प्यायले तर त्याचे वजन नियंत्रित ठेवता येते. तसेच ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी जेवणाच्या 1 तासानंतरच पाणी प्यावे.


एखाद्या व्यक्तीने सकाळी उठून दोन ग्लास पाणी प्यायल्यास  त्यांची पचनक्रिया मजबूत होऊ शकते. सकाळी दोन ग्लास पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते.


तसेच जेवणानंतर १ तासाने पाणी प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषले जातात.