मुंबई : कोविड 19चं इन्फेक्शन आपल्या श्वसन मार्गाचं फार नुकसान करतं. हे इन्फेक्शन रूग्णाच्या फुफ्फुसांची ताकद कमी करतं ज्यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास जाणवतो. यासाठी डॉक्टर रूग्णांना फुफ्फुसांसाठी एक्सरसाईज करण्याचा सल्ला देतात. जेणेकरून आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढून योग्य पद्धतीने श्वास घेता येईल. सीओपीडी तसंच अस्थमा अशा फुफ्फुसांसंदर्भातील आजारांवर डॉक्टर स्पायरोमीटरचा वापर करण्यास सांगतात. मात्र अनेकदा स्पायरोमीटरचा वापरण्याची योग्य पद्धत माहिती नसल्याने अनेकजण चुकीच्या पद्धतीने वापर करतात. स्पायरोमीटर वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पायरोमीटर एक एक्सरसाईज टूल आहे. न्यूमोनिया, ब्रॉन्कायटीस, सीओपीडी तसंच कोरोना यासांरख्या आजारांनंतर फुफ्फुसांना रिकव्हर करण्यासाठी स्पायरोमीटर या एक्सरसाईज टूलचा वापर करण्यात येतो. या प्रक्रियेला पल्मोनरी रिहॅबिलीटेशन देखील म्हटलं जातं. स्पायरोमीटरचा वापराद्वारे श्वास घेणं आणि सोडण्याच्या फोर्सला हळू-हळू वाढवण्यात येतं. स्पायरोमीटरद्वारे श्वास घेतल्यावर त्यामध्ये असणाऱ्या चेंडूंच्या माध्यमातून आपल्या श्वासाचा वॉल्म्यूम समजण्यास मदत होते.


स्पायरोमीटर वापरण्याची योग्य पद्धत


1. सर्वात पहिल्यांदा शांत राहून आपल्या श्वासाच्या गतीला सामान्य ठेवा
2. खुर्चीवर किंवा बेडच्या कडेला कंबर सरळ राहील अशा स्थितीत बसा
3. त्यानंतर आपल्या हातात स्पायरोमीटर सरळ पकडून डोळ्यांच्या समोर ठेवा
4. आता स्पायरोमीटरच्या माऊथपीसला ओठांमध्ये योग्य पद्धतीने पकडा. जेणेकरून ते चारही बाजूने बंद होईल.
5. यानंतर हळूहळू श्वास आत घ्या आणि त्यामध्ये असलेले तीन चेंडू शक्य असतील तेवढे उंच उडवा. 
6. सुरुवातील तुम्हाला ही प्रक्रिया कठीण वाटेल. मात्र सवय झाल्यानंतर तुम्ही सहजरित्या करू शकता.
7. श्वास घेण्याची प्रक्रिया सुरुवातीला किमान 5-6 वेळा करावी. 
8. त्यानंतर आता स्पायरोमीटरला वरच्या बाजूने पकडावे आणि श्वासा सोडावा. ही प्रक्रिया देखील 5-6 वेळा करावी.
9. हे करताना जर तुम्हाला चक्कर येण्याची किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला तर ही एक्सरसाइज त्वरीत थांबवा.


स्पायरोमीटरचा वापर करताना अनेकजण 'या' चुका करतात


1. काही जणं स्पायरोमीटरचा वापर करताना स्वतःला रिलॅक्स करत नाहीत. ज्यामुळे ही एक्सरसाईज करताना श्वास लागण्याची शक्यता असते.
2. स्पायरोमीटरचा वापर श्वास घेण्यासोबत श्वास सोडण्यासाठीही केला जातो. त्यामुळे याचा वापर करताना इनहेल करण्यासोबत संपूर्ण क्षमतेने श्वास सोडणंही गरजेचं आहे.
3. पाठ सरळ ठेऊन बसणं देखील या एक्सरसाइजसाठी महत्त्वाचं आहे.
4. स्पायरोमीटरचा वापर आक्रमक पद्धतीने करू नये. यामुळे फुफ्फुसांना नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे.