मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आले आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उष्माघाताचा (Heatstroke) धोका आहे. त्यासाठी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, उकाडा वाढत असला तरी या काळात देशात कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर विकेण्डला आणखीन तापमानाचा पारा वर चढणार असल्याने नागरिक हैराण होणार असले तरी आतापासून अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. त्यामुळे शरीरातील पाणी वाढविण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. 


 उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते म्हणून काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा उष्णतेचे अनेक विकार जाणवू लागतात. यावर उपाय म्हणजे जास्त पाणी पिणे आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. 


कशी घ्याल काळजी 


- नियमित प्राणायाम करण्यावर भर द्या. त्यामुळे उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
-  हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
- उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.
- फ्रीजमधील एकदम थंठ पाणी पिणे टाळा. माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश प्या. घटाघटा नको. 
- शितपेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
- आवळा, कोकम,  लिंबू, मठ्ठा,  ताक आदींचे सेवण करा. सरबत जरूर प्या.
- सकाळी ऊठल्यावर लगेच एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या.
- ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
- खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
- जिरे पावडर एक चमचा + खडीसाखर एक चमचा आणि एक ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
- दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
- जास्त करुन फळे खाण्यावर भर द्या. मात्र, उष्णता वाढविणारी फळे टाळा.