Rujuta Diwekar Tips: Junk Food शरीरासाठी घातक आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण जंक फूड म्हणजे काय? आणि ते कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं? हे कुणालाच कळत नाही. कधी कधी आपल्याला डाएट आणि हेल्दी वाटणारे पदार्थ हे खऱ्या अर्थाने जंक फूड असतात. वजन वाढण्यासोबत अनेक आजारांसाठी जंक फूड कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. जंक फूडमुळे अनेकांना त्रासही होतो. पण जिभेला सवय झाल्यामुळे अनेकजण त्यावर कंट्रोल करु शकत नाहीत. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या या टिप्सचा नक्की विचार करा. यामध्ये ऋजुताने Obvious जंक फूड आणि Non Obvious  यातील फरक अधोरेखित केला आहे. 


Obvious जंक फूड म्हणजे काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिझ्झा, बर्गर, कोला, कोक आणि साखरजन्य पदार्थांचा समावेश Obvious जंक फूडमध्ये येतो. मैदाजन्य पदार्थ, केचअप यासारख्या पदार्थ यामध्ये येतात.  साखर, सुक्रोज, व्हाईट टेबल शुगर आणि इतर उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप सारख्या पदार्थांचा देखील यामध्ये समावेश होतो.  


Non obvious जंक फूड म्हणजे काय?


पॅकेज फूड, पॅकेट ज्यूस यांचा समावेश Non obvious जंक फूडमध्ये होतो. तसेच योगर्ट्स, बिस्किट्स, चॉकलेट्स, स्प्रेड्स  - जाम, बटर, नट्स बटर, चॉकलेट सिरप, प्रोटीन पावडर, बेक चिप्स हे देखील जंक फूडमध्ये येत असून शरीरासाठी हानिकारक आहे. 


शरीरासाठी काय घातक कसे ओळखाल?  


पॅकेज फूड - कोणतेही पॅकेज फूड हे शरीरासाठी घातक असतं. मग त्या पॅकेज फूडवर कितीही म्हटलं असेल की, हे शरीरासाठी चांगले आहे. तरीही पॅकेट बंद करण्यासाठी त्या पदार्थांवर प्रक्रिया ही करावीच लागते. 
 
बॉडी पार्ट - कोणत्याही शरीराचे अवयव दाखवून जो पदार्थ विकला जातो, तो शरीरासाठी घातकच असतो. अशावेळी कोणत्याही जाहिरातींना बळी पडू नका. वजन झपाट्याने कमी करणारे पदार्थ असे काही नसते. 


प्रोटीन - ज्या पॅकेज फूडमधून शरीराला प्रोटीन मिळते, अशी जाहिरात केली जाते. ते शरीरासाठी घातकच असते. कारण ते सगळे पदार्थ जंकफूडमध्ये मोडतात. तसेच क्रिकेटर, ऍथलिट यांच्या जाहिराती दाखवून पदार्थ विकला जातो तेव्हा तो खाणे टाळा. तसेच लहान मुलांसाठी असे कोणतेही प्रोटीन पावडर नसते.


फ्री - मोफत असं काहीच नसतं. मोफत असलेला पदार्थ शरीरासाठी घातक ठरतो. त्यामुळे पिझ्झावर कोक फ्रि मिळत असेल तर ते घातकच किंवा कोणत्याही प्रोटीन पावडरवर टॉय देत असतील तरीही ते घातकच आहे. 


ऋजुता दिवेकर जंक फूड टिप्स



जंक फूडचे प्रमाण कमी कसे करावे? 


महिन्यातून एकदाच करा सेवन 
जंक फूडचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरुवातीला महिन्यातून फक्त एकदाच जंक फूडचे सेवन करा. तसेच जर तुम्ही महिन्यातून 8 वेळे जंक फूड खात असाल तर त्याचे प्रमाण 4वर करा. पुढच्या महिन्यात ते 2 वर करा आणि नंतरच्या महिन्यात जंक फूड न खाण्याचा निश्चय करा. 


पालकांनी पहिल बंद करावं
पालक मुलांना बक्षिस म्हणून जंक फूड देतात. मूल रडू लागलं किंवा त्रास देऊ लागलं तर त्याला शांत करण्यासाठी जंक फूड दिलं जातं. एवढंच नव्हे तर काही पालक स्वतः मुलांसमोर जंक फूडचे सेवन करतात. या सगळ्यात गोष्टी टाळल्या पाहिजेत. पालकांनी मुलांचे वाढदिवस रेस्टॉरंट किंवा जंक फूड कोर्टमधील पदार्थ खायला देऊ नये. 


ऍडिक्टशन
अनेकांना जंक फूडचे ऍडिक्शन असते. म्हणजे भूक नसतानाही अनेकजण जंक फूड खातात. हे जंक फूड शरीरासाठी अधिक घातक असते. हे समजून घ्यायला हवं. अल्ट्रा प्रोसेस फूडमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. जसे की, फॅटी लिव्हर, डायबिटिस, हार्टशी संबंधित आजार होतात.