Weight Loss Tips:`या` पद्धतीने साबुदाण्याचे करा सेवन, लठ्ठपणा होईल कमी
लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे साबुदाणे, `या` पद्धतीने करा सेवन
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यांमुळे अनेक शारीरिक समस्या जाणवतात. त्यामधील एक म्हणजे बेवी फॅट (Belly Fat). फक्त पुरुषच नाही तर महिला देखील बेली फॅटमुळे त्रस्त आहेत. बेली फॅट कमी करण्यासाठी अनेक उपाय आपण करतो. एवढंच नाही तर उकळलेलं पाणी, ग्रीन टी, व्यायाम असे अनेक उपाय आपण बेली फॅट कमी करण्यासाठी करतो. व्यायाम शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण साबुदाण्यामुळे देखील लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. (Sabudana Good For Weight Loss)
साबुदाणामध्ये (Sabudana) प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात. यासोबतच यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही आढळून येते.म्हणून आज जाणून घेवू की साबुदाणा तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी करा साबुदाण्याचं सेवन (Sabudana Good For Weight Loss)
- अनेकदा वजन कमी करण्यासाठी आपण डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करु शकत नाही. यामुळे तुमचं वजन तर कमी होतं पण तुम्ही आतून कमकुवत होऊ शकता. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आहारात साबुदाणा समाविष्ट केला तर तुम्ही निरोगी पद्धतीने वजन कमी करू शकता.
- वजन कमी (Weight Loss) करताना पोटाच्या समस्यांमुळेही अनेकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत साबुदाणा खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची तक्रार होत नाही. यासाठी साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर यामध्ये असलेले फायबर तुमच्या पोटाच्या समस्या कमी करते.
- साबुदाणा खाल्ल्याने तुम्हाला पुन्हा-पुन्हा अन्न खाण्याची इच्छा होणार नाही. याचे कारण म्हणजे साबुदाणा खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. कारण त्यात असलेल्या कॅलरीजमुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणार नाही, ज्यामुळे तुमचं वजनही वाढत नाही. (Weight Loss Tips)
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी साबुदाण्याची खिचडी अत्यंत लाभदायक आहे. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि लोह शुगर लेव्हल नियंत्रित ठेवते.