थंडीत `या` पदार्थांचं सेवन करणं ठरेल फायदेशीर
थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात.
मुंबई : थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेक उपाय केले जातात. असे असले तरी शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी काही पदार्थांची गरज असते.
बाजरी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी खाऊ घालावी. बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण असते. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक तत्त्व, मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅग्नीज, ट्रिप्टोफेन, फायबर, व्हिटॅमिन- बी, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते.
मध
हिवाळ्यात मधाचा उपयोग विशेष लाभकारी ठरतो. मधामुळे पचनक्रियेत सुधार होतो आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते. शरीराला निरोगी, स्वस्थ आणि उर्जावान ठेवण्यासाठी मधाला आयुर्वेदात अमृत मानले गेले आहे. सर्वच ऋतुंमध्ये मधाचे सेवन आरोग्यदायी आहे.
बदाम
बदाम सालीसकट खावा. बदामात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि फायबर उपलब्ध असते. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने महिलांनी याचे सेवन करणे फायद्याचे असते. हृदय आणि रक्त धामन्या (arteries) सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
भाज्या
दैनंदिन आहारात भाज्यांचा अवश्य समावेश करावा. भाज्या, शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढवतात आणि आपल्याला उष्णता प्रदान करतात. हिवाळ्यात मेथी, गाजर, पालक, बीट, लसूण इ. भाज्यांचे सेवन करावे.