मुंबई - प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांनी लिहलेल्या पुस्तकाचे मुंबईत काल प्रकाशन झाले. प्रोफेसर संजय बोराडे यांनी लहान मुलांच्या लठ्ठपणावर जनरेशन XL हे पुस्तक प्रकाशित केले. जनरेशन XL हे लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तक आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले , अभिनेता जॅकी श्रॉफ आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. संजय बोरुडे यांची राज ठाकरे यांचे व्याही ही आता एक नवी ओळख आहे. मात्र लठ्ठपणावर शस्त्रक्रिया करणारे देशातील पहिले डॉक्टर आहेत ही त्यांची खरी ओळख आहे. त्यांनी 2010 मध्ये अवघ्या 11 महिन्यांच्या मुलावर लठ्ठपणाची शस्त्रक्रिया केली आणि देशात लठ्ठपणावर शस्त्रक्रिया होऊ लागल्या. लहान मुलांच्या लठ्ठपणावर जनरेशन XL या पुस्तकात लिहले आहे. लठ्ठपणावर उपचार घेण्यापेक्षा लठ्ठपणापासून आधीच दूर राहण्यासाठी काय करावे याबाबत पुस्तकात माहिती देण्यात आली. 


आपला अनुभव सांगताना डॉ. बोराडे म्हणाले आजकाल लठ्ठ मुलं दिसू लागली आहेत. 11 महिन्याचं एक लठ्ठ बाळ माझ्याकडे आलं स्थुलतेमुळे त्याचा जीव धोक्यात आलेला, त्याचावर मी पहिली शस्त्रक्रिया केली ती यशस्वी ठरली, त्यानंतर लहान मुलांवर लठ्ठपणाची शस्त्रक्रिया करू लागलो, यानंतर मी अनुभव लिहायला सुरुवात केली आणि तोच अनुभव पुस्तकाच्या माध्यामातून समोर आणला आहे असे बोराडे यांनी सांगितले. 


पुस्तकातील ठळक मुद्दे


- लठ्ठपणाची कारण आणि प्रतिबंध याबाबत या पुस्तकात लिहिले आहे


- लहान मुलांवर शस्त्रक्रिया करणं आव्हानात्मक कारण त्यांचं शरीर नाजूक असते


- 10 वर्षाच्या आतील मुलं लठ्ठ का होतात? 


- आहारशैली, पालकांनी मुलांना आहारशैली काटेकोरपणे कशी पाळली पाहिजे


- लहान मुलांना मॉनिटरिंग करणे का गरजेचे...मुलांसोबत एकत्र बरोबर जेवायला बसा, टीव्ही पाहणं कमी कराव जेवताना


-  लठ्ठपणा शस्त्रक्रिया कश्या होतात काय आहे त्याबद्दल माहिती 


- भारतात वाढत चालेले लठ्ठपणाचे प्रमाण