HEALTH TIPS: डोळ्यांभोवतीची त्वचा खूप मऊ असते आणि त्यांची योग्य काळजी न घेतल्याने डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या आणि काळपटपणा वेळेआधीच दिसू लागतो. अनेक लोकांच्या डोळ्याभोवती सूज असते. याचे बहुतेक कारण योग्य दिनचर्या नसणे हे आहे.  रात्री नीट झोप न झाल्यास सकाळी डोळ्यांखाली सूज येऊ लागते.  त्यामुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोळ्यांखालील सूज तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर या पद्धतींचा अवलंब करा.
त्वचेखालील सूज बहुतेकदा एजिेगमुळे दिसून येते. कारण त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन वयानुसार कमी होऊ लागतात.  त्यामुळे डोळ्याभोवती सूज आणि काळी वर्तुळे दिसू लागतात.  यावर मात करण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे आवश्यक आहे


डोळ्यांखाली सूज आली असेल आणि ती दूर करायची असेल तर डोळ्यांवर थंड चमचा ठेवा.  डोळ्यांवर ठेवण्याआधी प्रथम चमचा फ्रीजमध्ये ठेवून थंड करा. याला कोल्ड कॉम्प्रेस पद्धत म्हणतात.  साधारण अर्ध्या तासानंतर चमचा थंड झाल्यावर सूज आलेल्या जागेवर,डोळ्यांवर ठेवा.  साधारण दहा ते पंधरा मिनिटे ठेवा.  असे केल्याने सूज कमी होते


ग्रीन टी बॅग्स



तंदुरुस्त राहण्यासाठी बहुतेक लोक ग्रीन टीचे सेवन करतात.  ग्रीन टी बॅग्स फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठी करू शकता.  ग्रीन टी बॅग्सफ्रीजमध्ये ठेवा आणि थंड करा. नंतर डोळ्यांवर ठेवा आणि पंधरा ते वीस मिनिटे राहू द्या.  यामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे कमी होतील तसेच सूज दूर होईल.


काकडी



काकडी ही खूप जुनी रेसिपी आहे.  डोळ्यांवर थकवा येत असेल आणि खाली सूज येत असेल तर काकडीचे तुकडे करून डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते आणि थकवा दूर होतो.  यासोबतच डोळ्यांखालील काळी वर्तुळेही दूर होतील.