Sex Addiction : वारंवार लैंगिक संबंधाविषयी विचार येतायत तर...; गंभीर समस्या तर नाही?
Sex Addiction : सतत सेक्सचा विचार करणं हा आजार आहे का? दरम्यान यावर आरोग्य तज्ज्ञांमध्ये दुमत दिसून येतं. सेक्स सतत विचार करण्यामागे तज्ज्ञांनी विविधं कारणं असू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Sex Addiction : एखादी गोष्ट गरज नसताना सतत करणं, पाहणं किंवा खाणं म्हणजेच व्यसन ( Addiction ) . आपल्यापैकी अनेकांना व्यसन असतं. व्यसन हे केवळ दारूचं नसून इतर गोष्टींचंही असू शकतं. अनेकदा काही व्यसनं ही आजारांचं रूपंही धारण करू शकतात. मात्र सतत सेक्सचा ( Sex Addiction ) विचार तुमच्या डोक्यात सुरु असणं, हा आजार असू शकतो का? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे. दरम्यान सतत सेक्सचा विचार करणं हा आजार असून शकतो यावर आरोग्य तज्ज्ञांमध्ये दुमत दिसून येतं.
ब्रिटनमध्ये खास बेवसाईट
सतत पॉर्न ( Porn ) पाहणं हे व्यसन एखाद्या व्यक्तीला असू शकतं. ब्रिटनमध्ये अशी काही लोकंही आढळून आली आहेत, ज्यांना पॉर्न पाहण्याचं व्यसन आहे. या व्यसनामुळे त्रासलेल्यांना लोकांसाठी एक वेबसाईट तयार करण्यात आली असून त्याद्वारे एक सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामध्ये एकूण 91 टक्के पुरुषांचा समावेश होता, मात्र यावेळी बोटावर मोजता येईल अशा 10 लोकांनी तज्ज्ञांकडे मदत घेतली होती.
सेक्सचा सतत विचार करण्यामागे काय कारणं?
सेक्स सतत विचार करण्यामागे तज्ज्ञांनी विविधं कारणं सांगितलेली आहेत. मात्र यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण नसल्याचंही त्यांचं मत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीची मानसिक परिस्थिती देखील या सततच्या सेक्सच्या विचारांना कारणीभूत ठरू शकते. डिप्रेशन, एकटेपणा, सतत होणारी चिडचिड या गोष्टीला कारणीभूत असल्याची दाट शक्यता आहे.
सतत सेक्सचा विचार करणं आजार आहे?
सेक्स करण्याच्या व्यसनाला 2013मध्ये 'डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स' मध्ये पुराव्यांअभावी सामील केलं नव्हतं. मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीला पाहून सेक्शुअल विचार येणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया मानली जाते. परंतु जर याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच सुचत नसेल तर ही समस्या गंभीर असण्याची शक्यता आहे.
सेक्सचा विचार मनात येण्याची इतर कारणं?
पार्टनरची तुम्हाला साथ नसणं
पार्टनरसोबत सेक्शुअल लाइफ एन्जॉय न करू शकणं
शारीरिक संबंधाबाबत दोघांमध्ये मतभेद असणं
गरजेच्या वेळी पार्टनर जवळ नसणं
काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार, सेक्सचा सतत विचार हा कोणता मानसिक आजार नाहीये. कोंलबिया विद्यापिठातील मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्ती ज्यावेळी जास्त उत्तेजित होतात, तेव्हा ते स्वत:वरील नियंत्रण गमावतात. मात्र कोणत्या गोष्टीला व्यसन असणं म्हणजे आजार नव्हे. दरम्यान सतत सेक्सचा विचार करणं हा आजार असतो, याबाबत ठोस पुरावेही नाहीत.