Sex Dream Interpretation in Marathi: आपल्या प्रत्येकाला रात्री (Night Dreams) झोपल्यानंतर अनेक स्वप्न पडतात. अनेकांना पडलेली स्वप्न ( Dreams ) ही चांगली असतात, तर काहींना पडणारी स्वप्न ही भीतीदायक देखील असू शकतात. स्वप्नांच्या दुनियेत असताना आपल्या डोक्यात असंख्य गोष्टी सुरु असतात. मात्र कधी तुम्हाला सेक्सविषयी स्वप्न पडलं आहे का? फिजीकल रिलेशनबाबत ( Physical intimacy ) स्वप्न पडणं ही फार कॉमन गोष्ट असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेक्ससंदर्भातील स्वप्न पाहिल्याने त्याचा रिलेशनशिपवर काही परिणाम होतो का? असा विचार अनेकदा आपल्या मनातही येतो. मात्र सेक्स संदर्भात जर तुम्हाला सतत स्वप्न येत असतील तर त्याचा नेमका अर्थ काय असतो, याचा विचार कधी तुम्ही केलाय का?


सतत सेक्ससंदर्भात स्वप्न पाहणं चुकीचं?


सेक्ससंदर्भातील स्वप्न अनेकदा इतकी विचित्र असतात की, त्यामुळे तुम्हीही चिंताग्रस्त होता. मात्र दररोज शारीरिक संबंधाबाबत स्वप्न पाहणं चुकीचं आहे का? मुळात शारिरीक संबंधांबाबत स्वप्न पाहणं ही सामान्य गोष्ट आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सेक्सच्या बाबतीत स्वप्न पाहणं, हे तुमच्या सेक्सुएलिटीला एक्सप्लोर करण्याची एक पद्धत असते. अशी स्वप्न पडणं अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे अशी स्वप्न पडणं म्हणजे काही चूक नाही. 


मुळात स्वप्नात येणारी फिलींग ही आपल्याला काय दर्शवते. आपण झोपेत असताना स्वप्नामध्ये भीतीस फिलींग्स आणि आपल्या मनात असलेल्या इच्छांना पाहतो. अनेकदा आपली फिलींग इतकी स्ट्रॉंग असते, ज्यामुळे सतत आपल्याला एकच स्वप्न येऊ लागतं. 


झोपेतील स्वप्न सेक्सुएलिटी दर्शवतात का?


दिवसभरातील ज्या गोष्टी आपल्या डोक्यात सुरु असतात, त्याचा अंश आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्वप्न तयार करतात, असं सायकोलॉजी सांगते. अशावेळी तुमचं डोकं जितकं क्रिएटीव्ह असतं, त्यानुसार स्वप्न विचित्र होत जातं. त्यामुळे झोपेत असताना येणाऱ्या स्वप्नात लैंगिक संबंध, होमोसेक्शुअल संबंध पाहणं अगदी सामान्य आहे. 


सेक्सुएलिटीची स्वप्न का येतात?


मुळात क्रिएटिविटीमुळे आपल्या सबकॉन्शियस माईंडमध्ये स्वप्न येतात. अशावेळी एखाद्या इमोशनल घटनेमुळे अशी स्वप्न येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात स्ट्राँग फिलींग असल्यास तुम्ही सेक्सुएलिटीची स्वप्न पाहू शकता. इतकंच नाही तर स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात ही स्वप्न येण्याची शक्यता अधिक असते.