White Tea For Weight Loss: हल्लीच्या काळात बदलत्या जीवनशैलीमध्ये उशिरानं का असेना, पण वाढत्या वजनानं त्रस्त होऊन बरेचजण काही सवयी बदलतात. यामध्ये आहाराच्या सवयींमध्ये बदल करण्यापासून साऱ्याची सुरुवात होते. बाहेरचं खाणं बंद इथपासून ते पहिला घाला घातला जातो तो म्हणजे चहा आणि कॉफी यांसारख्या पेयांवर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर, कुणी म्हणालं या नियमांना गोळी मारा आणि बिंधास्त चहा प्या! तर? विश्वास बसेल तुमचा? तुम्ही आतापर्यंत दुधाचा चहा, काळा चहा, ग्रीन टी वगैरे वगैरे बरेच चहा प्यायले असतील. पण, कधी सफेद चहाच्या प्रकाराबद्दल ऐकलंय? 


वजन कमी करण्याची तुमचीही इच्छा असेल, तर तुमच्यासाठी (White Tea) सफेद चहा कोणा एका वरदानाहून कमी नाही. ही चहा प्यायल्यामुळं तुम्हाला नितळ त्वचाही अगदी सहजपणे मिळेल. 


काय आहेत या चहाचे फायदे? 
व्हाइट टी (White Tea) मध्ये बरीच पोषक तत्त्वं आहेत. यामध्ये बऱ्याच एंटीमाइक्रोबियल क्वालिटीसुद्धा आढळतात. ज्यामुळं आपल्या शरीराला असणारा आजारपणांचा धोका कमी होतो. या चहामध्ये पॉलीफिनोल्स (Polyphenols), फायटोन्यूट्रिएंट्स (Phytonutrients) आणि इतरही पद्धतींचे कॅटेचिंस (Catechins) असतात. 


या सफेद चहामध्ये टॅनिन्स (Tannins), फ्लोराइड (Fluoride) आणि फ्लेवोनोइड्स (Flavonoids) अशीही फायदेशी तत्त्वं आहेत. या प्रकारच्या चहाच्या सेवनामुळं शरीराला धोका पोहोचवणारे फ्री रेडिकल्स नाहीसे होतात. 


Anti Aging गुणधर्म असल्यामुळं हा चहा चेहऱ्यावर वाढत्या वयोमानानुसार येणाऱ्या सुरकुत्या मिटवण्यास मदत करतो. सकाळच्या वेळात हा चहा प्यायल्यामुलं बरेच फायदे होतात. यामुळं थकवाही बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 


अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी हा चहा आवर्जून प्यावा. यामुळं गॅसेसचा त्रासही दूर होतो. स्मरणशक्ती आणखी दांडगी करण्यासाठी हा चहा फायद्याचा ठरतो. बॅड कोलेस्ट्रॉलमुळं जी मंडळी त्रस्त आहेत त्यांच्यासाठीही हा चहा मोठ्या मदतीचा. 


थोडक्यात काय, तर चहा एक आणि फायदे अनेक. मग, तुम्ही कधी सुरुवात करताय हा चहा प्यायला? 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)