मुंबई : देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना लस घेण्याचं वारंवार आवाहन करण्यात येतंय. अशातच मुंबईमध्ये सहा महिन्यांमध्ये गेल्या एकंही लस न घेतलेल्या 576 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सहा महिन्यांमध्ये एकंही लस न घेतलेल्या दोन तृतीयांश लोकांना आयसीयूमध्ये भरती करण्याची वेळ आली. यामध्ये यापैकी 93 टक्के लोकं म्हणजेच 576 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत केलेल्या अभ्यासात ही बाब उघड झालीये. ही आकडेवारी पाहिल्यावर लस किती अत्यावश्यक आहे हे लक्षात येईल. 


मृत्यूचं प्रमाण


  • एकंही लस न घेतलेल्या व्यक्ती- 93.05

  • एक लस घेतलेल्या व्यक्ती- 5.97

  • दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्ती- 0.96


यापूर्वी लसीकरण आणि मृत्यू यासंदर्भात अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याने होणारा मृत्यू दर खूप कमी नोंदवला गेला. या अभ्यासात समावेश करण्यात आलेल्या आणि लस घेतलेल्या 71 व्यक्तींनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. तर 604 लोकांनी कोविशिल्ड घेतली होती. 2 लोकांनी चीनची सिनोफार्म लस घेतल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये फक्त 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.


स्टडीमध्ये नमूद केल्यानुसार, लस घेतल्यानंतर कोरोना झाल्यावर 9.8 टक्के लोकांना रूग्णालयात भर्ती करावं लागलं तर केवळ 0.4 टक्के लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे या अभ्यासातून हे स्पष्ट होतं की कोरोनाची लस ही सुरक्षित आहे. आणि लस घेतल्यानंतर रूग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोकाही कमी होतो.