मुळव्याधवर उपचार करुन घेण्याबाबत का घाबरतात लोकं? अहवालात धक्कादायक खुलासा
भारतात का वाढतोय मुळव्याधचा त्रास? काय आहे यामागची कारणं. अहवालात पाहा काय आलंय पुढे.
मुंबई : मुळव्याध (Piles) ही भारतात झपाट्याने वाढत जाणारी समस्या बनली आहे. पण ही समस्या भारतात का वाढत आहे. याबाबत एका अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मुळात पहिलं कारण म्हणजे लोकं मुळव्याधचा त्रास ( Piles Problem) डॉक्टरांना सांगण्यात लाजतात. या समस्येवर जर वेळीच उपचार केले नाही तर ही समस्या पुढे वाढू शकते. मुळव्याध ही समस्या वाढण्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शारिरीक मेहनतीचं काम कमी झालं असून लोकं बसून तासनतास काम करतात. ( Why piles problem increase in India )
मेट्रो शहरांमध्ये ही समस्या अधिक वाढत असल्याचं अहवालात पुढे आले आहे. काही लोकांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की, 70 टक्के लोकांना असं वाटतं की, मुळव्याधचा त्रास असल्याचं सांगितल्यास लोकं त्यांची खिल्ली उडवतात. मुळव्याध ही समस्या म्हणून त्यावर उघडपणे बोललं जात नाही. उलट त्यावर खिल्ली उडवली जाते. असं काही लोकांचं म्हणणं आहे.
मुळव्याध बद्दल जागरुकता वाढवली जात आहे. 42 हून अधिक शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये 80 टक्के पुरुषांचा समावेश आहे. 26 ते 40 वयोगटातील बहुतांश भारतीय तरुणांनी मूळव्याधवर शस्त्रक्रिया (Hemorrhoid surgery) करुन घेतल्या आहेत. मुंबई, बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि हैदराबादमध्ये मुळव्याधची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
मुळव्याध होण्याचे कारण काय
मुळव्याध ( Piles ) ही जीवनशैलीवर आधारीत समस्या आहे. ज्यामध्ये लठ्ठपणा, कमी फायबरचे आहार, जास्त वजन उचलणे आणि जास्त वेळ बसणे ही मुळव्याध होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. पण वेळीच उपचार न केल्याने ही समस्या वाढते. ज्याचं मुख्य कारण म्हणजे लोकं डॉक्टरांचा सल्ला घेताना लाज बाळगतात.
20 टक्के लोकांना असा वाटतं की, हा लैंगिक संसर्गामुळे होतो आणि 10 टक्के लोकांना असं वाटतं की, यामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण मुळव्याध शस्त्रक्रिया ही सर्वात सामान्य शस्त्रक्रिया आहे.