मुंबई : सकाळी उठल्याबरोबर तुम्ही चहा ऐवजी दूध पिताय. मग नक्कीच ही सवय चांगली आहे. मात्र दूध प्यायल्यानंतर तुम्ही तातडीने मीठाचं सेवन करत असाल तर तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा लोक चुकून दूध पिल्यानंतर किंवा दूध पिण्याआधी काही अशा वस्तूंचे सेवन करतात, ज्यामुळे पोटासंबंधी त्रास जाणवू लागतो. त्यामुळे हे माहिती असणं आवश्यक आहे की, कोणत्या पदार्थाचे सेवन केल्यानंतर दूध पिणं टाळावं. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थाचं सेवन केल्यानंतर दुधाचं सेवन टाळावं याबाबत सांगणार आहोत.


मीठ


जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर दूध पिणं टाळा. मीठ खाल्ल्यानंतर काही वेळाने दुधाचं सेवन करावं. कारण मीठ आणि दूध पोटात एकत्र आल्यास पचनक्रियेला नुकसान पोहोचू शकते. 


मासे किंवा चिकन


तुम्ही मांसाहारी असाल तर मासे खाल्ल्यानंतर दुधाचं सेवन टाळले पाहिजे. अन्यथा फूड पॉयझनिंगची शक्यता असते. तसंच यामुळे पोटाशी संबंधित इतरही त्रास उद्भवू शकतात.


उडीद डाळ


उडीद डाळ खाल्ल्यानंतर देखील दूध पिणं टाळावं. या डाळीच्या सेवनानंतर किमान 2 ते 3 तासानंतर दूध प्यायलं पाहिजे. उडीद डाळीवर लगेच दुधाचं सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.


दही 


दही खाल्ल्यानंतर लगेच दुधाचे सेवन करू नये. यामुळे पोट बिघडण्याची दाट समस्या असते. यामुळे पोट दुखणं तसंच पोटाच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात.