मुंबई : तुम्ही देखील त्या लोकांसारखेचं आहात का? जे जिमची फी भरतात पण जिममध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. असं असेल तर काळजी करण्याची गरज नाही. संशोधकांप्रमाणे घरी व्यायाम करणे जिममध्ये व्यायाम करण्याएवढेच फायदेशीर आहे. घरी व्यायाम केल्याने तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचू शकतात.


घरी केलेल्या व्यायामाचा फायदा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द जर्नल ऑफ फिजीओलॉजी'मध्ये याचे फायदे सांगितले आहेत. या अभ्यासात दिसून आले की, हाय इंट्रेस्टींग इंटरवल ट्रेनिंग म्हणजेच HIIT प्रोग्रामचे प्रशिक्षण केलं त्यांचे लक्ष होम बेस्ड प्रोग्रामचा लठ्ठपणा झालेले व्यक्ती, ज्यांना हृदयरोगाचा धोका आहे, त्यांच्यावर काय होतो याकडे होते.


लठ्ठपणा असलेल्या 32 लोकांना 12 आठवडे व्यायाम करण्यास सांगितला


'लिव्हरपूल जॉन मुर्स यूनिवर्सिटी' आणि या अभ्यासाचे 'ऑथर सॅम स्कॉट' म्हणाले, होम बेस्ड HIIT प्रोग्राममध्ये असलेले व्यायामाचे प्रकार फक्त वेळ आणि पैसे वाचवत नाही तर अशा व्यक्तीला एक्टिव्ह करतात, जे इनएक्टिव असतात आणि त्यामुळे त्या लोकांचे आरोग्य चांगले झाले. या अभ्यासासाठी 32 लोकांना 12 आठवडे व्यायाम करायला सांगितला. 


संशोधनात 3 वेगवेगळे गट केले, यात खालील निष्कर्ष निघाले आहेत. या 32 लोकांना 3 वेगवेगळ्या गटात विभागण्यात आले. 


  • पहिला गट - ज्या लोकांवर लॅब बेस्ड सायक्लिंग HIIT प्रोग्राम दिला आहे

  • दुसरा गट - ज्या लोकांनी यूके सरकारद्वारे सांगितलेले, 150 मिनिटाचे मॉजरेट इंटेंसिटी व्यायाम केला.

  • तिसरा गट - ज्या लोकांनी होम बेस्ड HIIT प्रोग्रामचे सोपो बॉडी वेट एक्ससाईज केले अशा लोकांसाठी आहे, ज्यांना अधिक फिटनेसची गरज नाही आणि कोणत्या equipment शिवाय करता येईल. 


संशोधनांनी बघितले की HIIT प्रोग्राम लठ्ठपणाने त्रासलेल्या लोकांचा फिटनेस करण्यात तेवढंच यशस्वी आहे, जेवढे दुसरे प्रोग्राम आहेत.