मुंबई : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे! असं म्हटलं जात असलं तरीही अनेकांसाठी अंड्याचं  सेवन आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. सकाळच्या नाश्त्याला अनेकदा अंड्याची किंवा बनवल्या जाणार्‍या पदार्थांची निवड केली जाते. मात्र अंडयातील पांढरा भाग हा आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो हा धोका तुम्हांला ठाऊक आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंड्यातील पांढरा भाग फॅट फ्री आणि कमी कॅलेरीचा असला तरीही त्याचे सेवन त्रासदायक ठरू शकते. अंड शाकाहारी की मांसाहारी? या वादावर वैज्ञानिकांंचा आश्चर्यकारक खुलासा


किडनीला अपायकारक  


अंड्यातील पांढरा भाग हा प्रोटीनयुक्त असतो. त्यामुळे किडनीचा विकार असलेल्यांच्या आहारात त्याचे अधिक प्रमाणात सेवन झाल्यास किडनीला त्रास होऊ शकतो. किडनीविकार असलेल्यांमध्ये ग्लोमेरूलर फिल्टरेशन रेट (जीएफआर)  कमी असते. यामुळे किडनीचे फिल्टरचे काम होते. मात्र पांढर्‍या भागातील प्रोटीन घटक जीएफआरचे प्रमाण कमी करते.  उन्हाळ्याचा दिवसात अंड खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं का ?


मांसपेशींमध्ये वेदना 


अंड्यातील पांढर्‍या भागात बायोटिन घटक कमी  करण्यास कारणीभूत ठरते. बायोटिनच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन बी 7 आणि व्हिटॅमिन H  म्हणतात. अंड्यातील पांढरा भाग अ‍ॅब्युमिन घटकांनी मुबलक असतो. यामुळे बायोटिन शोषून घेण्याची क्षमता कमी होते. परिणामी त्वचावोकार होऊ शकतात. मांसपेशींमध्ये वेदना, केसगळती असा त्रास वाढतो. 


अ‍ॅलर्जी 


काही लोकांना अंड्यातील पांढरा भाग खाल्ल्याने त्रास होतो. यामध्ये त्वचेवर सूज, लाल रॅश दिसणं, खाज येणं, डोळ्यात पाणी येणं असा त्रास होऊ शकतो. अंड्यातील पांढरा भाग खाल्ल्यास काही लोकांना श्वास घेण्यासही त्रास होतो. रक्तदाब कमी होतो परिणामी काही जणांना अचानक चक्कर येणं असा त्रास होतो.  


साल्मोनेला बॅक्टेरिया 


अंड्यातील पांढरा भाग साल्मोनेलाने दुषित असतो. साल्मोनेला हा एक बॅक्टेरिया आहे जो कोंबड्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो. साल्मोनेला हे अंड्यातील बाहेरच्या आवरणामध्ये आढळते. त्याचा नाश करण्यासाठी अंड योग्य तापमानामध्ये शिजवणं आवश्यक आहे. वाफवलेली अंडी किती दिवस टिकतात ?